प्रवीण दटके कुठून लढणार?

प्रवीण दटके
प्रवीण दटके

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रवीण दटके यांना भाजपने शहराध्यक्ष केल्याने ते कुठून निवडणूक लढणार, याची चर्चा उपराजधानीत सुरू झाली आहे. त्यांच्या नियुक्तीने भाजपच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून येत्या विधानसभेत मोठे फेरबदल होण्याचेही संकेत मिळत आहे.
नगरसेवक, महापौर ते भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असा दटके यांचा आजवरचा प्रवास आहे. महापालिकेचे सत्तापक्षनेतेही ते होते. अवघ्या चाळीसीतील त्यांचा हा प्रवास आहे. विद्यामान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर ते शहरातील सर्वांत युवा महापौर होते. माजी शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांचा कार्यकाळ जानेवारी महिन्यातच संपला होता. तेव्हापासून शहाध्यक्ष म्हणून प्रवीण दटके यांच्या नावाची चर्चा होती. दरम्यान, लोकसभेची निवडणूक असल्याने भाजपने शहर कार्यकारिणीतील फेरबदल लांबणीवर टाकले होते. शुक्रवारी कोहळे यांचा राजीनामा घेऊन पक्षाने दटके यांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपवली.
दटके यांचे वडील प्रभाकरराव दटके हेसुद्धा राजकारणात होते. एकेकाळी भाजपत त्यांचा चांगलाच दरारा होता. महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष तसेच दुय्यम सेवा निवड मंडळावरही ते होते. आकस्मिक निधनानंतर त्यांच्या राजकीय वारसा प्रवीण यांनी पुढे नेला. आज भाजपच्या युवा फळीतील सक्षम नेता म्हणून प्रवीण दटके यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. नावाप्रमाणे ते राजकारणातही प्रवीण आहेत. याची प्रतीची महापालिकेत अनेकांना आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com