प्रवीण दटके समर्थकांची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

नागपूर : फक्त जातीचा विचार करून मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आल्याने मध्य नागपूरमधील भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्या समर्थकांनी संघ मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बडकस चौकात निदर्शने करून रोष व्यक्त केला. यावेळी भाजपतर्फे केल्या जात असलेल्या जातीय राजकारणाचा निषेध नोंदवणारे फलकही त्यांनी झळकावले. 

मध्य नागपूरमधून प्रवीण दटके यांनी उमेदवारी मागितली होती. पक्षांतर्गत सर्व्हेत त्यांचेच नाव आघाडीवर होते. त्यांना उमेदवारी मिळेल असेच सर्वांनाच वाटत होते. दोन महिन्यांपूर्वीच त्यांना शहराध्यक्ष करण्यात आले होते. त्यांचे हात निवडणुकीसाठी बळकट केल्याचे बोलले जात होते. मात्र, मंगळवारी भाजप उमेदवारांची यादी जाहीर झाले. ती बघून दटके समर्थकांना चांगलाच धक्का बसला. आमदार विकास कुंभारे यांनाच येथे उमेदवारी देण्यात आली. हलबा समाज नाराज होईल तसेच जातीय समीकरण राखण्यासाठी दटके यांच्या नावावर फुली मारण्यात आल्याची चर्चा आहे. पक्षनेतृत्वाच्या निर्णयाच्या विरोधात उघडपणे नाराजी दर्शविण्याचे प्रमाण वाढत चालल्याने भाजपची शिस्त सैल होत चालली असल्याचे दिसून येते. 
मध्य नागपूरमध्ये हलबा आणि मुस्लिम समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कुंभारे यांची दावेदारी नाकारल्यास हलबा नाराज होईल आणि ते कॉंग्रेसला मतदान करतील, अशी भीती वर्तवली जात होती. पक्षाला कुठलीच जोखीम घ्यायची नसल्याने आमदार कुंभारे यांनाच कायम ठेवण्यात आल्याचे समजते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pravin datke