शिवसेनेकडून मतदारसंघात निवडणुकीची पूर्वतयारी 

shivsena
shivsena

वाडी - लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच रामटेक लोकसभा निर्वाचन  क्षेत्रात निवडणुकीची पूर्व तयारी शिवसेनेने सुरू केल्याचे दिसून येते. सध्या या संसदीय क्षेत्राचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने करीत आहेत. परंतु, राज्यात भाजप-शिवसेना  युतीचे वातावरण तापले असून युती व मैत्री दोन्ही तुटण्याच्या मार्गावर आहेत.

दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढण्याच्या तयारीला लागल्याचे दिसून येते. ‘युती होवो, अथवा न होवो’ या आरक्षित जागेवर शिवसेनेचाच उमेदवार निवडणूक मैदानात राहण्याचे निश्‍चित झाले आहे. याच अनुषंगाने रविवारी वाडी व ग्रामीण क्षेत्रातील बूथप्रमुख, बीएलए कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन दत्तवाडीतील शुभम मंगल कार्यालयात पार पडले. उद्‌घाटन खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते झाले. हिंगणा विधानसभा संपर्कप्रमुख अशोक सपकाळ, जिल्हाप्रमुख राजेंद्र हरणे, दिवाकर पाटणे, दिलीप माथनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. संतोष केचे, हरीश हिरणवार, संघटक रवी जोडांगडे, संजय अनासाने, किताबसिंग चौधरी, उपतालुकाप्रमुख रुपेश झाडे, प्रा. मधू माणके-पाटील, शहरकोषाध्यक्ष वसंतराव ईखनकर यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले.संमेलनाआधी वाडीतील वॉर्ड क्र.१ कोहडे ले-आउट, वॉर्ड क्रमांक ३ टेकडी वाडी, गौतमनगर येथे खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते शाखा फलकाचेही उद्‌घाटन करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com