मेळघाटात आणखी एक मातामृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

अचलपूर/जामली (जि. अमरावती) - चिखलदरा तालुक्‍यातील टेम्ब्रुसोडा येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकाराने पुन्हा एकदा आरोग्यसेवेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.

पूजा संजय दहीकर (वय 19), असे आदिवासी महिलेचे नाव आहे. या महिलेला 17 जुलै रोजी प्रसूतिकळा सुरू झाल्या होत्या; मात्र घरच्यांनी दवाखान्यात न नेता घरीच प्रसूती करण्याचे ठरविले होते. तथापि, आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला जबरदस्तीने गावातील आरोग्यकेंद्रात दाखल केले. यादरम्यान प्रकृती अधिकच खालावल्याने तिला अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तेथेही फिजिशियन नसल्याने अमरावतीच्या डफरीन रुग्णालयात रेफर केले. तिथे उपचार करून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र या उपचारादरम्यान ती महिला प्रसूत होऊन मृत बाळ जन्माला आले; तर महिलेचा मध्यरात्री मृत्यू झाला.

Web Title: pregnant mother death in primary health center