गर्भवती महिलेची नागपूर रेल्वेस्थानकावरच प्रसूती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

नागपूर - गावी परतण्यासाठी रेल्वेची प्रतीक्षा करीत असलेल्या गर्भवती महिलेला नागपूर रेल्वेस्थानकावरच प्रसूतीकळा सुरू झाल्या. काही कळण्यापूर्वीच तिने गोंडस बाळाला जन्म दिला. बाळ-बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. रेल्वे सुरक्षा दलाच्या विशेष पथकातील सदस्यांनी मदतीचा हात दिला. 

राजस्थानच्या जयपूर येथील रहिवासी असलेले भोंदूलाल भागदीप शहरातील चौकात किंवा गावांमध्ये फुगे विक्रीचा व्यवसाय करतात. पत्नी काली आणि दोन मुलीसुद्धा त्यांना सहकार्य करतात. मिळकतीच्याच शोधात भोंदूलाल गर्भवती पत्नी आणि आपल्या दोन मुलींना घेऊन  रेल्वेने नागपुरात आले होते.

पत्नीच्या प्रसूतीची वेळ जवळ येत असल्याने गावी परतण्यासाठी गुरुवारी सकाळी संपूर्ण कुटुंब नागपूर स्थानकावर पोहोचले. तिथेच कालीला प्रसूतीकळा सुरू झाल्या. कुणीही ओळखीचे नसल्याने मदत मागावी तरी कुणाकडे, हा पेच त्यांच्या पुढे निर्माण झाला. तातडीने पत्नी व मुलांना घेऊन भोंदूलाल फलाट क्रमांक २, ३ वर मुंबई एन्डच्या दिशेने फारशी गर्दी नसलेल्या ठिकाणी गेले. महिला वेदनांनी विव्हळत होती. 

रेल्वे सुरक्षा दलातील उषा तिग्गा, सुषमा ढोमणे, विकास शर्मा यांनी सकाळी १०.४० वाजता घटनास्थळाकडे धाव घेतली. तिथे पोहोचेपर्यंत महिलेने मुलाला जन्म दिला होता. उषा तिग्गा व सुषमा ढोमणे यांनी बाळाला सांभाळत बाळंतिणीला धीर दिला. उपनिरीक्षक राजेश औतकर यांनी स्टेशन व्यवस्थापक कार्यालयाशी संपर्क साधून डॉक्‍टरांना पाचारण करण्याची सूचना केली. थोड्याच वेळात रेल्वेचे डॉक्‍टर दाखल झाले. प्राथमिक उपचारानंतर बाळ-बाळंतिणीला मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले. संपूर्ण उपचारानंतर गावी परतण्यासाठी भोदूलाल सहकुटुंब रेल्वेस्थानकावर आले.

Web Title: Pregnant Woman Delivery on Nagpur Railway Station