गरोदर महिलेचा बाळासह मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

सावनेर (जि.नागपूर)  : येथील डॉक्‍टर चांडक यांच्या खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेचा बाळासह मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी अडीचदरम्यान सावनेर येथे घडली. रूपाली राहुल आसुटकर (वय 29, रा. हिवरा, ता. सौंसर, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे.

रुपाली बाळंतपणाचा उपचार डॉक्‍टर चांडक यांच्याकडे सुरू होता. बुधवारी सकाळी तिला प्रसुती कळा सुरू झाला. तिला बाळंतपणासाठी पती राहूल व सासरच्या मंडळींनी तिला सावनेर येथील डॉ. चांडक यांच्या दवाखान्यात घेऊन आले. डॉक्‍टरने तिच्यावर उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृतेच्या नातेवाईकांनी या घटनेची तक्रार सावनेर पोलिसात दाखल केली आहे. डॉक्‍टरांनी रुग्णाची व्यवस्थीत काळजी घेतली नसल्याने व उपचाराची गरज असताना तिच्यावर योग्य उपचार केले नसल्याचा आरोप करीत दवाखान्याजवळ गोंधळ घातला. डॉक्‍टरांनी सावनेर पोलिसांनी तक्रारीवर कारवाई करीत मृतदेहाला शासकीय मेडिकल रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. सावनेर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pregnant woman dies with baby