गर्भवती महिलेची जिल्हा शल्यचिकित्सकाकडे धाव ; कारवाई न झाल्यास उपोषण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

खेट्री येथील गर्भवती महिला तनवीर अंजुम हे चतारीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी 9 मे रोजी गेली असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून औषध व इंजेक्शन घेण्याचे चिठ्ठीवर लिहून परिचारिका स्मिता डॅनियल घनबहाद्दुर यांच्याकडे पाठवले.

खेट्री : येथील सहा महिन्यांची गर्भवती महिला 9 मे रोजी चतारी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी गेली असता, रूग्णालयातील स्मिता डॅनियल घणबहाद्दुर या परिचारिकेने गर्भवती महिलेवर उपचार करण्यास नकार देऊन अरेरावी करून अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे गर्भवती महिलेने 11 मे रोजी थेट जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली असून सदर परिचारिकेवर कारवाई करण्याची मागणी निवेदनद्वारे केली.

खेट्री येथील गर्भवती महिला तनवीर अंजुम हे चतारीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी 9 मे रोजी गेली असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून औषध व इंजेक्शन घेण्याचे चिठ्ठीवर लिहून परिचारिका स्मिता डॅनियल घनबहाद्दुर यांच्याकडे पाठवले. परिचारिकाने अरेरावी व अपमानास्पद वागणूक देऊन सदर गर्भवती महिलेवर उपचार करण्यास नकार दिला. अखेर उपस्थित असलेले कर्मचाऱ्यांच्या मध्यस्थी केल्यावर वैद्यकीय अधिकारी यांनी उपचार केले. तोपर्यंत अर्धा ते पाऊन तास उपचारांआभावी ताटकळत फिरवले, असा आरोप गर्भवती महिलेने दिलेल्या निवेदनातून केला आहे.

याप्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. तातडीने कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर गर्भ अवस्थेमध्ये उपोषणास बसण्याचा इशारा दिल्याचे निवेदनात नमूद केले आहे. सदर निवेदनाची प्रत जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी प्रसुती करण्यास नकार

गेल्या काही दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेची प्रसुती करण्यास याच परिचारिकाने नकार दिल्यामुळे त्या महिलेच्या नातेवाईकांनी तिला अकोला हालविले होते. परंतु महिलेची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे त्यांनी तक्रार केली नव्हती, अशी विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Pregnant womans district runs with surgeon Fasting if action is not taken

टॅग्स