डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

यवतमाळ - येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्‍टरांचा हलगर्जीपणा व खासगी डॉक्‍टरांनी केलेल्या सदोष प्रसूतीमुळे एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी संतप्त नातेवाइकांनी मृतदेह पोलिस ठाण्यात आणून कारवाईची मागणी केली. संबंधित महिलेची सामान्य प्रसूती झाल्याने तिला दुसऱ्याच दिवशी घरी पाठविण्यात आले होते. परंतु, प्रकृती अस्वस्थ झाल्याने परत त्याच नर्सिंग होममध्ये आणले. सलाईन व औषधोपचार करून डॉक्‍टरांनी परत पाठविले. शनिवारी (ता. 19) प्रकृती अस्वस्थ झाल्याने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी महिलेला मृत घोषित केले. या प्रकाराने संतप्त नातेवाइकांनी तिचा मृतदेह थेट पोलिस ठाण्यात आणून दोषी डॉक्‍टरांवर कारवाईची मागणी केली.
Web Title: pregnant women death by doctor laxity