प्राथमिक शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांची नांदेडला बदली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

नविन शैक्षणिक सत्राला येत्या काही दिवसात सुरवात हाेणार असली तरी आरटीआय प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. अशातच प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांची विनंतीनुसार नांदेड येथे बदली करण्यात आली आहे.

अकाेला - जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रशांत दिग्रसकर यांची नांदेड येथे शिक्षणाधिकारी प्राथमिक पदावर बदली झाली आहे. त्यांच्या बदलीमुळे प्राथमिक शिक्षणाची घडी विस्कळीत हाेणार आहे. 

नविन शैक्षणिक सत्राला येत्या काही दिवसात सुरवात हाेणार असली तरी आरटीआय प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. अशातच प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांची विनंतीनुसार नांदेड येथे बदली करण्यात आली आहे. यासंदर्भात बुधवारी शासनाने निर्णय घेतला आहे. एेन प्रवेश प्रक्रियेच्या सुरवातीलाच दिग्रसकर यांची बदली झाल्याने अकाेल्यातील पद रिक्त झाले आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाची घडी विस्कळीत हाेण्याची शक्यता आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभार माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्याकडे साेपविण्यात येण्याची शक्यता आहे. यासाेबतच नांदेड येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीपकुमार साेनटक्के यांची हिंगाेली, तर बीड येथील शिक्षणाधिकारी भावना राजनाेर यांची विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई येथे बदली झाली आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Primary education officer Digraskars transfer to Nanded