प्राचार्य शंकरलाल कोठारी यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

यवतमाळ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व ख्यातनाम वक्‍ते प्राचार्य शंकरलाल कोठारी (वय 85) यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले.

यवतमाळ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व ख्यातनाम वक्‍ते प्राचार्य शंकरलाल कोठारी (वय 85) यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले.

आमडापूर (जि. बुलडाणा) येथे शंकरलाल कोठारी यांचे शिक्षण झाले. अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर यवतमाळ येथील बाबाजी दाते वाणिज्य महाविद्यालयात 1960 पासून त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयाचे संचालन करणाऱ्या एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेतही पुढाकार घेतला. लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कोठारी यांनी 18 वर्षे जबाबदारी पार पाडली. संघाच्या नगर संघचालकांची जबाबदारी त्यांनी 14 वर्षे समर्थपणे पेलली. तत्पूर्वी 1975च्या आणीबाणी पर्वात त्यांना 19 महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला होता. प्राचार्य कोठारी यांची "दीदी' ही कादंबरी व "संघर्ष' हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या मागे पत्नी व तीन मुले असा आप्तपरिवार आहे.

Web Title: principal shankarlal kothari death