गोंदियात बनावट देशी दारू कारखान्यावर छापा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

गोंदिया : हरसिंगटोला येथील शेतातील फार्महाऊसमध्ये सुरू असलेल्या बनावट देशी दारू कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. यात 3 लाख 28 हजार 120 रुपयांच्या बनावट देशी दारूसह 6 लाख 58 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बाजपेयी वॉर्ड गोंदिया येथील श्‍याम चाचेरे हा काही दिवसांपासून भाड्याने खोली घेऊन बनावट दारू तयार करीत आहे. शिवाय ही दारू तो चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पाठवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी चौकशी केली असता श्‍याम चाचेरे हा हरसिंगटोला- रतनारा येथील विनोद जुलेल याच्या शेतातील फार्महाऊसमध्ये बनावट देशी दारू बनविण्याचा कारखाना चालवीत असल्याचे उघड झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी चाचेरे याच्या बनावट दारू कारखान्यावर छापा टाकला. आरोपी श्‍याम चाचेरे व फार्म हाऊसचा मालक विनोद जुलेल याच्यावर दवनीवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Print fake country liquor factory in Gondia