कारागृहातून फरार कैद्याने थाटला संसार 

अनिल कांबळे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

नागपूर : हत्याकांडाच्या गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी कमलेश मोतिराम राठोड (39) हा अभिवचन रजेवर बाहेर आल्यानंतर फरार झाला होता. त्याने नाव बदलवून संसार थाटला. सात वर्षे संसारात रमल्यानंतर पत्नी व चार वर्षाच्या मुलासह फिरायला गेल्यामुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. 

दाभा तांडा येथे राहणाऱ्या कमलेशला खुनाच्या गुन्ह्यात अटक केली होती. दोषसिद्धीनंतर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 2011 मध्ये तो अभिवचन रजेवर महिनाभरासाठी बाहेर आला. मात्र, रजेचा अवधी संपल्यानंतरही तो कारागृहात परतला नाही. पोलिसांनाही तो सापडला नाही. 2013 मध्ये त्याच्याविरुद्ध हिंगणा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला. तो सात वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. 

यादरम्यान तो सचिन रामदास वरगट हे नाव धारण करून खापरी पुर्नवसन येथे भाड्याने राहात होता. त्याने मिहान येथील हेक्‍सावेअर प्रा. लि. कंपनीत काम करण्यास सुरवात केली. इतकेच नाही तर त्याने सुनिता नावाच्या महिलेशी लग्न केले आणि त्याला 4 वर्षांचा एक मुलगासुद्धा आहे. 2011 पासून पोलिस सतत त्याचा शोध घेत होते.

दरम्यान, हिंगणा पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाला खबऱ्याकडून त्याच्याबद्दल माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला खापरी पुर्नवसन परिसरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर पकडले.

Web Title: The prisoner has started his marital life