कारागृहातील कैद्यांनी केली योगासने 

अनिल कांबळे 
गुरुवार, 21 जून 2018

नागपूर : गेल्या आठवड्याभरापूर्वी मध्यवर्ती कारागृहात योग सप्ताह प्रारंभ झाला होता. आज जागतिक योग दिनाचे औचित्य साधून योग सप्ताहाची सांगता करण्यात आली. आज मध्यवर्ती कारागृहातील 900 कैद्यांनी योगासने केली. या कार्यक्रमाला जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश डी. वाय. पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी कारागृह अधीक्षक राणी भोसले उपस्थित होत्या.

कारागृह महासंचालक कार्यालय, आयुष मंत्रालय, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायजेशन आणि जयदुर्गा शिक्षण संस्थेच्या वतीने कारागृहात 21 जून जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योगशिबिराचे आयोजन करण्यात आले. सप्ताहाचे उद्‌घाटन कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या हस्ते करण्यात आले होते. योग साधनेला केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात मानल्या जाते. गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील सर्वच कारागृहात योग करण्यासाठी कैद्यांना प्रोत्साहन व प्रेरित केल्या जात आहे. 

योग साधनेचा योग्य परिणाम कैद्यांवर पडत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे योग करणाऱ्या कैद्यांना शिक्षेत तीन महिन्यांपर्यंतची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. सुवर्णा मानेकर, ध्यानगुरू अश्‍विन झवेरी, डॉ. कीर्तीदा अजमेरा, प्रदीप कोटेकर, डॉ. निलेश वानखडे, मनोज बंगरिया उपस्थित होते. वरिष्ठ तुरुंगाधिकारी व्ही.सी.वानखडे, के.बी. मिरासे, कांदे, रजनलवार, लक्ष्मण साळवे आणि संजीव हटवादे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन योगेश पाटील गुरुजी यांनी तर आभार श्रीमती भोसले यांनी मानले. 

सकारात्मक उपक्रम! 
हातून कळत-नकळत चूक किंवा गुन्हा घडल्यामुळे व्यक्‍ती कारागृहात शिक्षा भोगत असतो. त्यामुळे त्याला जर योग-प्राणायामची सवय लागली तर तो पुन्हा समाजशिल व्यक्‍ती होतो. त्याच्यात सकारात्मक बदल होऊन त्याच्यातील आक्रमकता लोप पावते.

- योगेश देसाई, उपमहानिरीक्षक. ( कारागृह) 

Web Title: Prisoners made prisoner Yogas