प्रियांका म्हणाल्या, आपण लवकरच नागपुरात भेटू

दिल्ली येथे काँग्रेसच्या नवनियुक्त महासचिव प्रियांका गांधी यांच्यासोबत उमाकांत अग्निहोत्री.
दिल्ली येथे काँग्रेसच्या नवनियुक्त महासचिव प्रियांका गांधी यांच्यासोबत उमाकांत अग्निहोत्री.

नागपूर - काँग्रेसच्या नवनियुक्त महासचिव प्रियांका गांधी यांना सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट देण्याचे निमंत्रण शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिले. त्यांनी हसतच आपण लवकरच नागपूरल भेटू, असे आश्‍वासन दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

राष्ट्रीय महासचिव झाल्यानंतर आज प्रथमच प्रियांका गांधी काँग्रेसच्या दिल्लीतील राष्ट्रीय कार्यालयात आल्या होत्या. याप्रसंगी शहराध्यक्ष विकास ठाकरे, अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, विवेक निकोसे आदींशी त्यांची भेट झाली. यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया, के. राजू त्यांच्यासोबत होते. विकास ठाकरे यांनी काँग्रेसची जनसंवाद यात्रा, जनसंपर्क अभियान आणि जनसंघर्ष यात्रेची माहिती दिल्लीतील नेत्यांना दिली. विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ दिल्लीला गेले आहे. यात उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार, शेख हुसेन, अभिजित वंजारी, अतुल लोंढे, ओवैस कादरी, प्रशांत धवड, रमण पैगवार, संदीप सहारे, मनोज सांगोळे, संजय महाकाळकर, नितीश ग्वालवंशी, रमेश पुणेकर, हरीश ग्वालवंशी, उज्ज्वला बनकर, रशमी धुर्वे, दर्शनी धवड, साक्षी राऊत, नितीन साठवणे, गुड्डू तिवारी, इरशाद अली, अशरफ खान, दिनेश बानाबाकोडे, पंकज लोणारे, मिलिंद सोनटक्के, विवेक रमेश निकोसे, धरम पाटील, पंकज थोरात, प्रवीण गवरे, रमण ठवकर, जलील अन्सारी, संतोष लोणारे, आसिफ शेख, वसीम खान, अनिल पांडे, आकाश तायवाडे, पंकज निघोट, प्रवीण सांदेकर, कुमार बोरकुटे, महेश श्रीवास, वैभव काळे, मोहम्मद समीर, बशीर शेख, प्रशांत पाटील, पीयूष लाडे, राजेश पौनिकर, संदीप देशपांडे आदींचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com