परिवहन महामंडळ मेगा भरतीमध्ये मोठा घोळ : सागर कलाने

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

शेगाव :  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती 2019 - 2020 मध्ये एकुण 4416 पदांची भरती घेण्यात येणार आहे मात्र त्यात मोठा घोळ असल्याचा आरोप अमरावती जिल्हा युवक कॉग्रेस जिल्हा उपाध्यक्ष व अनुसुचीत जाती जिल्हध्यक्ष सागर कलाने यांनी केला आहे. भरतीसाठी पात्र पात्रता 10, 12 वी उत्तीर्ण आणि जडवाहन परवाना अशी आहे. परंतु वाहक या पदाकरीता जडवाहन परवानाची अट लागू पडत नाही. तसेच वाहन या पदाकरीता अनेक महिलांकडे पात्रतेला आवश्यक असे बॅच व बिल्ला लायसन्स परवाना आहे. परंतु जड वाहन परवाना आणि 3 वर्षाचा अनुभव ही अट अनिवार्य असणे आवश्यक  नाही. कारण वाहन या पदांकरीता महिला सुध्दा पात्रतेस पात्र आहे.

शेगाव :  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती 2019 - 2020 मध्ये एकुण 4416 पदांची भरती घेण्यात येणार आहे मात्र त्यात मोठा घोळ असल्याचा आरोप अमरावती जिल्हा युवक कॉग्रेस जिल्हा उपाध्यक्ष व अनुसुचीत जाती जिल्हध्यक्ष सागर कलाने यांनी केला आहे. भरतीसाठी पात्र पात्रता 10, 12 वी उत्तीर्ण आणि जडवाहन परवाना अशी आहे. परंतु वाहक या पदाकरीता जडवाहन परवानाची अट लागू पडत नाही. तसेच वाहन या पदाकरीता अनेक महिलांकडे पात्रतेला आवश्यक असे बॅच व बिल्ला लायसन्स परवाना आहे. परंतु जड वाहन परवाना आणि 3 वर्षाचा अनुभव ही अट अनिवार्य असणे आवश्यक  नाही. कारण वाहन या पदांकरीता महिला सुध्दा पात्रतेस पात्र आहे. महिला यांचेकडे जडवाहन परवाना व 3 वर्षाचा अनुभव नाही त्यामुळे त्या पात्रतेपासुन वंचित राहणे हे अयोग्य तसेच महिलांना फक्त 30 टक्केच आरक्षण दिलेले आहे. 

अशा प्रकारच्या मेगा भरतीमध्ये गोर गरीब, होतकरु, गरजु व्यक्ती यातुन वगळण्याची दाट शक्यता आहे. तसेच जाहीरातीमध्ये पदाचा सरळ उल्लेख न करता चालक तथा वाहक असा उल्लेख केला आहे. चालक याचा अर्थ ड्रायव्हर व वाहक याचा अर्थ कंडक्टर असा होत असून उपरोक्त जागांची भरती जर अवजड वाहन परवाना व 3 वर्षाचा अनुभव ही अट कायम करीत असेल तर वाहन यांचेवर व ज्यांनी यापुर्वी वाहक या पदाकरीता परिक्षा अनुत्तीर्ण झाले आहेत व ते पुन्हा परिक्षा देण्यास उत्सुक आहेत अशावर अन्याय होण्यासारखे आहे. करीता चालक पदांच्या रिक्त जागा व वाहक पदांच्या रिक्त जागा वेगवेगळ्या दर्शवून त्याप्रमाणे भरती करण्यात यावी असे निवेदन महासचिव सागर देशमुख यांचे  मार्गदर्शनाखाली व जिल्हा उपाध्यक्ष सागर कलाने यांचे नेतृत्वाखाली देण्यात आले आहे. 

यावेळी प्रदेश सचिव  परिक्षीत जगताप, प्रदेश सचिव विक्रम ठाकरे, समीर जवंजाळ,जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, जिल्हा महासचिव सागर यादव, जिल्हा महासचिव समीर देशमुख, रोहित देशमुख, मयुर देशमुख, तिवसा विधानसभा अध्यक्ष रितेश पांडव, अमरावती विधानसभा अध्यक्ष निलेश गुहे, निखिल बुरघाटे, मेळघात विधानसभा अध्यक्ष यशवंत काळे, धामणगाव विधानसभा अध्यक्ष शेंडे, वरुड विधानसभा अध्यक्ष अमोल इंगोले, अमरावती विधानसभा उपाध्यक्ष गुडडू हमीद, बडनेरा विधानसभा अध्यक्ष आशिष यादव, तिवसा विधानसभा उपाध्यक्ष अंकुश जुनघरे, महासचिव सौरव किरकटे, तन्मय मुळवे, किरण महल्ले , आशिष भातकुले, संजुय विश्‍वकर्मा आदिंची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: problem in recruitment of ST says sagar kalane