विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमीच नाही ; नियमावलीकडे खासगी शाळांची पाठ

विवेक मेतकर
शुक्रवार, 18 मे 2018

अकोला : राज्यातील सर्व खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने गतवर्षी कठोर पावले उचलली. सर्व शाळांसाठी नव्याने नियमावली जाहीर केली असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश बजाविले. नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कडक कारवाई करण्याचे संकेतही नियमावलीत दिले. मात्र, नियमांची अंमलजावणी झाली नसल्याचे सध्या चित्र आहे.

अकोला : राज्यातील सर्व खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने गतवर्षी कठोर पावले उचलली. सर्व शाळांसाठी नव्याने नियमावली जाहीर केली असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश बजाविले. नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कडक कारवाई करण्याचे संकेतही नियमावलीत दिले. मात्र, नियमांची अंमलजावणी झाली नसल्याचे सध्या चित्र आहे.

राज्यात अनेक ठिकाणी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषण, विनयभंग यांसारखे प्रकार उघडकीस आले. याबाबत शालेय शिक्षण विभागाने कडक पावले उचलली. खासगी शाळांच्या सर्व स्कूल बसमध्ये व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे सक्‍तीचे केले. शाळेच्या वेळेत शिक्षकांवरही नजर ठेवण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये नियंत्रण कक्षाची स्थापना करण्याच्या सूचना दिल्या. विद्यार्थ्यांना शाळेत सोडणे व घेण्यासाठी येणाऱ्या पालकांना ओळखपत्र देण्याची सक्‍ती शाळा व्यवस्थापनावर होती.

ओळखपत्र असणाऱ्यांनाच मुलांना घेऊन जाण्यास परवानगी दिली जावी, असे या नियमावलीत सूचित करण्यात आले. शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, वॉचमन यांचा रहिवासी पुरावा व छायाचित्र यांचा संग्रह करणे बंधनकारक केला. शिवाय याची माहिती नजीकच्या पोलिस स्थानकात जमाही करावी लागत होती. शिक्षकांसह कर्मचाऱ्यांच्या मागील कार्यकाळाविषयीही संपूर्ण माहिती व त्याची पडताळणी करण्याचे सक्‍त आदेश बजाविले असले तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना शाळांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

शाळेमध्ये कोणत्याही प्रकारची गुन्हेगारीशी संबंधित घटना घडल्यास त्याची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी लागते. असे प्रकार दडपण्याचा किंवा आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रकार घडल्यास शाळा व्यवस्थापन व प्राचार्य यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे गेल्या वर्षी नव्याने लागू करण्यात आलेल्या नियमावलीत मुद्दे नमूद केलेले आहे. मात्र, अंमलबजावणीशिवाय हे नियम कागदी घोडेच सिध्द होत आहेत. 

येत्या शैक्षणिक सत्राकडे असेल लक्ष

ही नियमावली सादर करून जवळपास वर्षभराचा काळ गेला असला तरी अंमलबजावणीकडे खासजी शाळांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. मात्र, २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात अंमलबजावणीकडे लक्ष असेल.

- अशी आहे नियमावली

* स्कूल बसची नियमित तपासणी करण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाकडे
* बसच्या दोन्ही बाजूला शाळेचे नाव, संपर्क क्रमांक लिहिणे आवश्‍यक
* बसमध्ये सीसीटीव्ही व जीपीएस प्रणाली सक्‍तीची
* बसमध्ये चालकाबरोबरच एक महिला कर्मचारी असणे बंधनकारक
* चालक, सहायक चालक, अन्य कर्मचारी यांची माहिती व छायाचित्र शाळेकडे असणे आवश्‍यक

* शाळा सुटल्यानंतर वर्गामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी राहिली आहे का, याची नियमित पाहणी सक्‍तीची
* बसमधून आलेल्या व गेलेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदीसाठी एक पुस्तक ठेवून नियमित भरणे आवश्‍यक
* नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याचे शासनाचे संकेत

Web Title: the problems with security of students school management does not follows guidelines