अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त

मनोहर बोरकर
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

एटापल्ली : तालुक्यातील वादग्रस्त सुरजागड पहाडीवरील लोहखनीजाचे अवैधरित्या उत्खनन व वाहतूक केली जात असल्याच्या माहितीवरून वनपरिक्षेत्र अधिकारी संजुदास राठोड यांनी वाहतूक करणारे तीन ट्रक जप्त करून प्रशासकीय कार्यवाही केली आहे.

एटापल्ली : तालुक्यातील वादग्रस्त सुरजागड पहाडीवरील लोहखनीजाचे अवैधरित्या उत्खनन व वाहतूक केली जात असल्याच्या माहितीवरून वनपरिक्षेत्र अधिकारी संजुदास राठोड यांनी वाहतूक करणारे तीन ट्रक जप्त करून प्रशासकीय कार्यवाही केली आहे.

गेली तीन वर्षापासून लॉयलड्स मेटल कंपनीच्या वतीने लोहखनीजाचे उत्खनन करुण चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्गुस स्टील उद्योगाला पुरवठा केला जात आहे. शासनाने दिलेल्या लीज व्यतिरिक्त वनविभाग कार्यक्षेत्रतुन अवैध लोहखनीज उत्खनन व वाहतूक केली जात असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे (ता 11) गुरुवारी भामरागड वनविभागाचे एटापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरजागड लोहखनीज पहाडीवर जाऊन अवैध लोहखनीज उत्खनन करणारे दोन जेसीबी मशीन व MH 34 AB 8896,  MH 40  BG 3181 व MH 34 AB 8743 असे क्रमांक असलेली कंपनीची तीन ट्रक ताब्यात घेतले. यावरील चालकांनाही ताब्यात घेण्यात आले असून चार दिवस होऊनही त्यांचेवर कोणतीही कार्यवाही केल्याचे वनविभागकडून सांगण्यात आले नाही.

सदरचे तिन्ही ट्रकवर वनपरिक्षेत्र कार्यालय एटापल्लीच्या ताब्यात ठेवण्यात आली आहे. लॉयलड्स मेटल सारख्या मोठ्या कंपनी विरुद्ध कार्यवाही केली जात असल्याने राजकीय दबाव असून प्रकरणात निष्पक्ष कार्यवाही केली जाते की, मिटविले जाते अशी शंका नागरिकांमध्ये उपस्थित केली जात आहे.

सदर प्रकारणातील कार्यवाहिची सविस्तर माहिती मिळविण्याकरीता वनपरिक्षेत्र अधिकारी संजुदास राठोड यांचा नकार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यास सांगितले एटापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयात मात्र गेली चार दिवसांपासून कोणतेही जबाबदार अधिकारी उपस्थित नाही, माहिती देण्यास सर्व टाळाटाळ करीत आहेत. वृत्तापत्र प्रतिनिधिस पाहताच उपस्थित कनिष्ट अधिकारी निघुन जातात कार्यालयाचे बाहेर,
मुख्यवनसंरक्षकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता फोन उचलला नाही.

Web Title: Proceedings of forest department against illegal mining excavation three trucks seized

टॅग्स