प्रक्रिया लांबल्याने जागा रिक्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

पालकांनी फिरवली पाठ - २० जुलैनंतर निघणार तिसरा लकी ड्रॉ
नागपूर - शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत २५ टक्के जागांवर समाजातील दुर्बल घटकांना प्रवेश मिळावा म्हणून शासनाने सोय केली. मात्र, आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबविताना प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका पालकांना बसला. प्रक्रियेस झालेल्या विलंबामुळे शाळांमध्ये प्रवेश घेणे हा मानसिक त्रास झाल्याने पालकांनी प्रवेशप्रक्रियेकडे पाठ फिरविल्याचे दिसते. त्यामुळे आरटीईअंतर्गत ४० टक्के जागा रिक्त राहिल्याचे दिसून येते. २० जुलैनंतर पुन्हा तिसरा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.

शहरातील नामवंत शाळांमधील नर्सरी ते पहिल्या वर्गातील प्रवेशाची प्रक्रिया डिसेंबर महिन्यात सुरू होते. जानेवारी महिन्यात जवळपास सर्वच शाळांतील प्रवेशाची प्रक्रिया संपते. यादरम्यान आरटीई प्रवेशाची प्रक्रिया राबविल्यास शाळांमध्ये त्याअंतर्गत शंभर टक्के प्रवेश होण्याची शक्‍यता असते. मात्र, दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक घोषित केले जाते. त्यासाठी शाळांमधील आरटीईच्या प्रवेशाची संख्या मागविली जाते. मात्र, बऱ्याच शाळा अगोदरच प्रवेश पूर्ण करीत असल्याने योग्य माहिती देत नसल्याचे समजते. ही प्रवेशप्रक्रिया अद्याप सुरू आहे. मात्र, जून महिन्याच्या १५ तारखेला सीबीएसई आणि २६ जूनला राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा सुरू झाल्या. त्यामुळे प्रक्रियेत सहभागी असलेल्या पालकांनी मिळेल त्या शाळेत प्रवेश घेतले. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया विद्यार्थ्यांच्या की शाळांच्या फायद्याची, हा प्रश्‍न निर्माण होतो. दुसरीकडे ज्या विद्यार्थ्यांचा आरटीईनुसार प्रवेश होतो, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशासाठी मानसिक त्रास दिला जातो. त्यामुळे आरटीईत प्रवेश घेण्यापेक्षा दुसरीकडे प्रवेश घेण्यास पालक प्राधान्य देताना दिसून येतात. सर्वांना प्रवेश यासाठी शासनाकडून २ हजार ८०० जागांसाठी दुसरा ‘लकी ड्रॉ’ घेतला तरी यातील ४० टक्के पालकांनी प्रवेशच घेतलेले नसल्याचे दिसते. विशेष म्हणजे प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली. आता पुन्हा एकदा तिसरा लकी ‘ड्रॉ’ घेण्यात येणार आहे. यातूनही विभागाला काही साध्य होईल याची आशा कमी असल्याने यापुढे प्रक्रिया राबविताना बऱ्याच प्रमाणात सुधारणा कराव्या लागणार आहेत.

Web Title: Process empty space Delay