एक प्राध्यापक तीन महाविद्यालयांत नोकरीवर!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या एका महाविद्यालयात कंत्राटी म्हणून काम करणाऱ्या प्राध्यापकाची तीन महाविद्यालयांत नोंदणी  असल्याचे सत्य उघडकीस आली. या प्रकरणी विद्यापीठाने दोन महाविद्यालयांना स्पष्टीकरण मागविले. दरम्यान, महाविद्यालयाचे स्पष्टीकरण येताच, त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे समजते. मात्र, यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयांना ‘ऑनलाइन अप्रुव्हल’ देण्याचा निर्णय घेतला आहे.

प्राध्यापक भरती बंद असल्याने अनेक महाविद्यालयांचा डोलारा हा कंत्राटी प्राध्यापकांवर आहे. वर्कलोडच्या आधारावर या प्राध्यापकांची निवड करण्याचा अधिकार हा संबंधित शिक्षण संस्थेला असतो. त्यामुळे काही संस्था ही आवश्‍यकतेपेक्षा कमी प्राध्यापक हे नियमित ठेवून कंत्राटी प्राध्यापकांवर काम भागवताना दिसून येते. यासाठी अन्य महाविद्यालयात काम करणाऱ्या प्राध्यापकांचे कागदपत्रांचा वापर करून त्यांचे आपल्या महाविद्यालयातील अप्रुव्हल दाखवितात. अशा प्रकारांमधून विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करण्याचा प्रताप शिक्षण संस्था आणि प्राध्यापकांनी चालविला आहे.

नुकताच दोन बी. एड. महाविद्यालयांनी अशाचप्रकारची फसवणूक केल्याचे उघडकीस झाले आहे. या दोन्ही महाविद्यालयांवर विद्यापीठाने कारवाईही केली आहे. या दोन्ही महाविद्यालयांची नावे सांगण्यात विद्यापीठाने नकार दिला असला तरी शिक्षणाचे धडे  देणाऱ्या शिक्षण संस्थांकडून होणारी ही फसवणूक गंभीर आहे. त्यामुळेच पुढील शैक्षणिक सत्रापासून विद्यापीठाने महाविद्यालयांची नोंदणी, शिक्षण भरती ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Professor Three College Service Crime