पुंगी बजाओ आंदोलनातून सरकारचा निषेध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

नागपूर : निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ हलबा समाजाने रविवारी गोळीबार चौकात पुंगी बजाओ आंदोलन करीत प्रश्‍नांकडे लक्ष वेधले. येणाऱ्या दिवसांमध्ये आंदोलन अधिक तीव्र करण्यासह निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना दम दाखवून देण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. हलबा क्रांती सेनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले.

निवडणुकांच्या वेळी हलबा समाजाला न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन भारतीय जनता पक्षाने दिले होते. सत्तेवर येऊन कार्यकाळ संपत असतानासुद्धा न्याय मिळाला नाही. उलट समाजाची अवस्था आणखीच बिकट झाली आहे. दिलेला शब्द फिरविल्याचा आरोप करीत हलबा समाजबांधवांनी पुंगी वाजवून सरकारचा निषेध नोंदविला. समाजाला न्याय मिळवून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. बहिऱ्या सरकारच्या कानापर्यंत आवाज पोहोचविण्यासाठी पहिल्या टप्प्यात पुंगी बजाओ आंदोलन करण्यात आले. आताही सरकारला जाग आली नाही तर आंदोलन उग्र करण्यात येईल, असा इशारा उपस्थितांनी दिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prohibition of government