पिक उत्पादकता वाढीसाठी सुद्धा राबविणार प्रकल्प!

happy farmer akola.jpg
happy farmer akola.jpg

अकोला : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात पिक उत्पादकता वाढीसाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभागाशी निगडीत विविध सहभागीदारांचा सहभाग घेण्यात येईल. त्याअंतर्गत 4 हजार 568 संस्थांना प्रत्येक गावाची जबाबदारी सोपविण्यात येईल. जिल्ह्यात या माध्यमातून पिकांची लागवड ते विक्री व विक्रीपश्चात प्रक्रिया या विविध टप्प्यांवर शेतीशाळा राबवून हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे, या पथदर्शी प्रकल्पाच्या संकल्पनेला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी (ता. ३०) मंजुरी दिली. 

जिल्हा नियोजन भवनातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शारीरिक अंतर राखत खरीप हंगामपूर्व नियोजनाची बैठक पार पडली. बैठकीत जिल्ह्यात एकूण 4 लाख 82 हजार 620 हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना घरपोच बियाणे व अन्य निविष्ठा मिळाव्या यासाठी आत्मा अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या 1800 शेतकरी गटांमार्फत 1006 गावांत या कृषी निविष्ठा पोहोचविण्याचे नियोजन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, सर्व आमदार व कृषी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

रेशनकार्ड नसलेल्यांची माहिती गोळा करा!
बैठकीत पालकमंत्री बच्चू कडू यांनी ज्या लोकांकडे कार्ड नाही अशा लोकांची माहिती संकलीत करुन ती त्वरीत सादर करा असे निर्देश दिले. ज्या लोकांकडे पुरेसे धान्य आहे त्यांनी जादाचे धान्य हे धान्य बॅंकेत जमा करुन गरीबांना धान्य देण्याबाबत उपाययोजना करण्याबाबत प्रयत्न करावे असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. 

परजिल्ह्यातील लोकांच्या तपासणीचे नियोजन करा!
कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन कालावधीत अन्यत्र अडकलेल्या लोकांना आता त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था करण्याबाबत दिशानिर्देश प्राप्त झाले आहेत. संबंधित लोक आपापल्या गावी परतल्यानंतर त्यांच्या पोहोचण्याची, आरोग्य तपासणी, अलगीकरण आदी व्यवस्थांचे परिपूर्ण नियोजन करा, असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी बैठकीत दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com