अकोल्यात प्रॉपर्टी ब्रोकरची हत्या 

अकोल्यात प्रॉपर्टी ब्रोकरची हत्या 

अकोला - सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सहाय्यक संस्था निबंधक यांच्या कार्यालयात प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले यांची दिवसाढवळ्या अग्निरोधक यंत्राचे सिलिंडर (फायर इस्टिंग्यूशर) डोक्‍यात घालून निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 6) दुपारी घडली. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. 

महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष असलेले हुंडीवाले हे प्रॉपर्टी ब्रोकर म्हणून काम करत होते. सोमवारी (ता. 6) दुपारी ते कौलखेड परिसरातील शैक्षणिक संस्थेच्या संदर्भातील सुनावणीसाठी न्यास नोंदणी कार्यालयात गेले होते. सुनावणीसाठी आरोपी व त्यांचे साथीदार न्यास नोंदणी कार्यालयात उपस्थित होते. त्यामुळे हुंडीवाले व आरोपी यांच्यात शाब्दीक वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होताच आरोपींनी कार्यालयातील भिंतीवर असलेले अग्निरोधक सिलिंडर काढून हुंडीवाले यांच्या डोक्‍यावर जोरदार प्रहार केले. आरोपींच्या साथीदारांनीही जवळच असलेले लाकडी टेबल व खुर्चीच्या सहाय्याने हुंडीवाले यांच्यावर हल्ला केला. हुंडीवाले यांचा जागीच मृत्यू झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com