प्रॉपर्टी डिलरची निर्घृण हत्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

नागपूर - शहरालगत असलेल्या तरोडी बुद्रूकच्या माजी सरपंचाच्या पतीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. रविवारपासून ते बेपत्ता होते. अनैतिक संबंधाच्या संयशावरून शेतमजुराने त्यांची हत्या केली आणि गावालगतच्या नाल्याच्या पाईपमध्ये त्यांचा मृतदेह दडवून ठेवला. नंदनवन पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली असली तरी कमालीची गोपनियता बाळगल्याने अरोपींसंदर्भात अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. 

नरेंद्र ऊर्फ राजू किसनाजी हरिणखेडे (36) असे मृताचे नाव आहे. ते एका बड्या राजकीय पक्षाशी संबंधित होते. त्यांचे वडील आणि पत्नी रितूसुद्धा माजी सरपंच आहेत. त्याना एक मुलगा आणि मुलगी आहे. नरेंद्र यांच्याकडे शेती असून प्रॉपर्टी डिलींगचाही व्यवसाय करीत होते. त्यांच्या शेतीला लागूनच डेअरी फार्म आहे. मुळचा बालाघाट येथील रहिवासी रूपसिंह किसना सोळंकी (35) तिथे दूध काढण्याचे काम करीत होता. तिथेच तो पत्नी आणि तीन मुलांसह वास्तव्यासही होता. 

सुत्रांच्या माहितीनुसार किसनाला त्याच्या पत्नीचे नरेंद्रसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. 

असा झाला "गेम' 
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय दृढ झाल्याने किसन अस्वस्थ होता. त्याने नरेंद्रच्या हत्येचा कट रचला. नरेंद्रला धडा शिकविण्यासाठी मदत करण्याची याचना त्याने मित्रांना केली. रविवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास सोळंकीने नरेंद्रला फोन केला. भुलथापा देत गावालगतच्या निर्जनस्थळी बोलावून घेतले. याठिकाणी पूर्वीपासूनच सोळंकीचे साथीदार दबा धरून बसले होत. पण, हत्या करण्याचा त्यांचा इरादा नव्हता. नरेंद्र तिथे पोहोचताच किसनाने वाद घालणे सुरू केले. काही कळण्यापूर्वी सोळंकीने लाकडी दांड्याने सपासपवार केले यामुळे नरेंद्रचा मृत्यू झाला. यानंतर मात्र घाबरलेल्या सर्वांनीच घटनेवर पांघरून घालण्यासाठी मृतदेह पाईपमध्ये दडवून ठेवला होता. 

Web Title: Property dealers murder in nagpur