मूलभूत अधिकारांचे जतन करा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

सावनेर (जि. नागपूर) : रस्ते, नाल्या, दिवाबत्ती, निवारा व गरिबांना राशन दुकानातील अन्नपुरवठा हा लोकांचा मूलभूत अधिकार असताना शहरातील नागरिक समस्याग्रस्त का?, असा सवाल आमदार सुनील केदार यांनी केला. सावनेर नगर पालिकेवर धडक देत त्यांनी प्रशासनाला नागरिकांच्या समस्येविषयी जाब विचारला. येत्या पंधरा दिवसात समस्या मार्गी लावा, असा खणखणीत इशाराही सुनील केदार यांनी यावेळी दिला.

नगर परिषदेच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी शुक्रवारी दुपारी 12 वाजता आमदार सुनील केदार यांच्या नेतृत्वात पालिकेवर धडज देण्यात आली. नागरी समस्येविषयक निवेदन यावेळी प्रशासनाला दिले. मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी आमदार सुनिल केदार व प्रशासनापुढे व्यथा मांडल्या. नारिकांनी मांडलेल्या समस्येमध्ये पंचवीस वर्षे वास्तव्याला होऊनही मालकीचे पट्टे मिळाले नाहीत. पंतप्रधान घरकुल योजनेत गरजू वंचित राहीले. सुरुवातीला चाळीस हजार रुपये मिळाले, मात्र, आता शेवटल्या टप्यात काम येऊनही वजन ठेवले नाही म्हणून विलंब केला जात असल्याचा आरोप केला. याशिवाय वीज बिलाच्या समस्या सोडविण्यासाठी महावितरणने नगर पालिकेतच टेबल लावून पंधरा दिवसांत समस्या सोडविण्याचा इशारा केदारांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला, अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protect Fundamental Rights