निवडणूक बॅलेटपेपरने घ्या ईव्हीएमच्या विरोधात धरणे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

 नागपूर- भाजपने ईव्हीएम मॅनेज करून महापालिकेची निवडणूक जिंकल्याचा आरोप करून सर्वपक्षीय प्रजातंत्र बचाओ समितीच्या वतीने शनिवारी संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी निवडणूक ईव्हीएमने नव्हे, तर बॅलेट पेपरने घेण्याची मागणी केली.

ईव्हीएम लोकशाहीसाठी घातक आहे. मतदारांनी दिलेले मत संबंधित उमेदवाराला मिळाले की नाही, हे यातून कळत नाही. यात घोळ करूनच भाजप सत्तेवर आली, असा आरोप करीत बॅलेट पेपरच्या आधारे नव्याने निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली.

आंदोलनात हाजी शेख हुसेन, रमण ठवकर, सुशील बालपांडे, कांता पराते, ईश्‍वर बाळबुधे, ताराचंद दीपक गजभिये, विक्रम गुप्ता, सलीम अन्सारी, तौसिफ अहमद, शैलेश जैस्वाल, बंडू तळवेकर, दिनकर वानखेडे, निर्मला घाडगे, सय्यद शाहीन, आसिफ अली, अब्दुल वशीम, मधुकर गीते, अहमद खान, ऍड. राजकुमार थोरात, सुरेखा तळवकेर, अशफाक अली, कुमार रविकांत, सुनील दहीकर, असलम शेख आदी सहभागी झाले होते.

Web Title: protest against EVM