Buldhana : सिंदखेड राजा तालुक्यातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ; शेतकऱ्यांचा मोर्चा Protest farmer animal buldhana | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

buldhana

Buldhana : सिंदखेड राजा तालुक्यातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ; शेतकऱ्यांचा मोर्चा

सिंदखेड राजा - तालुक्यातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी तारीख २९ मे रोजी सकाळी तहसील कार्यालय येथे मोर्चा काढला. शहरातील व तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार सुनील सावंत यांना निवेदन दिले आहे.

रोहिंच्या हैदोसमुळे शेतकरी त्रस्त आहेत शासनाने या प्रकरणी शेतकऱ्यांना दिलास देण्याची मागणी यावेळी करण्यात आल शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न आल्यास येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर तालुक्यातील शेतकरी बहिष्कार घालतील असा इशारा शेतकरी मोर्चेकऱ्यांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की,शेत शिवारातील रोहिंचा त्रास व त्यावर सबंधित प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, रोहींचा त्रास असलेल्या वनविभागाच्या भागात तार कुंपण करावे,नुकसान पंचनामे त्वरित करावेत, नुकसान भरपाई देता येत नसल्यास कुंपण साठी शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान द्यावे,बँकेने शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेले होल्ड त्वरित काढावे असे निवेदन म्हटले आहे.

यावेळी दिलीप चौधरी,अक्षय ठाकरे,कैलास मेहेत्रे, सखाराम चौधरी,शहाजी चौधरी,सिद्धार्थ जाधव, अनिल मेहेत्रे,संदीप मेहेत्रे,दत्ता चौधरी,अनिल जावळे, भिकाजी खार्दे,कैलास येडुबा मेहेत्रे,नरहरी तायडे, गजानन मेहेत्रे,सखाराम बर्डे,संजय तायडे,बबन मेहेत्रे, यांच्यासह शेकडो शेतकरी यावेळी सहभागी झाले होते.