दानवेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न पोलिसांनी थांबवला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

मोताळा (जि. बुलडाणा) - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे राज्यभरात निषेध करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज (शुक्रवार) निदर्शने करण्यात आली. यावेळी दानवे यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात येणार होता. मात्र, दानवेंचा पुतळा ताब्यात घेत पोलिसांनी पुतळा जाळण्याचा प्रयत्न थांबविला.

दानवे यांनी बसस्थानक चौकात तुरीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांची खिल्ली उडवत शिवराळ भाषा वापरली होती. त्यामुळे शिवसेनेच्या संतप्त कार्यकर्ते त्यांचा पुतळा घेऊन येथील बसस्थानक चौकात निदर्शने केले. दरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत दानवेंच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला. बोराखेडी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेऊन स्थानबद्ध केले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

Web Title: Protest of Raosaheb Danve's statement in Buldhana