प्रक्रियेपूर्वीच अकरावीचे "प्रोव्हिजनल' प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जून 2019

नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीमार्फत अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. या प्रक्रियेनुसारच अकरावीचे प्रवेश देण्यात येणार असताना, त्यापूर्वीच शहरातील काही नामवंत कनिष्ठ महाविद्यालयांद्वारे विद्यार्थ्यांच्या "प्रोव्हिजनल' प्रवेश घेत, पालकांची आर्थिक लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

शहरात 1 जूनपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली. प्रक्रियेत आतापर्यंत 24 हजारावर विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग भरलेला आहे. अर्जाचा दुसरा भाग भरण्यासाठी शिक्षण विभागाकडून अद्याप वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला न जुमानता शहरातील तीन ते चार कनिष्ठ महाविद्यालयांनी समांतर प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. या महाविद्यालयांद्वारे अर्जाचा पहिला भाग भरणाऱ्या पालक, विद्यार्थ्यांकडून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मागून घेत, त्यांचे "प्रोव्हिजनल' प्रवेश करून घेतल्याचे कळते. यासाठी प्रत्येकी साडेआठ ते दहा हजार रुपयेही आकारले आहे. याबद्दलची कुठलीच पावती कनिष्ठ महाविद्यालयांकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी चिंतेत आहेत. मात्र, प्रवेश प्रक्रिया अद्याप पहिल्याच टप्प्यात असताना, या महाविद्यालयांकडून अशाप्रकारे पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल करीत प्रवेश देण्याच्या प्रकार प्रक्रियेला छेद देणारी ठरत आहे. मात्र, या प्रकारापासून केंद्रीय प्रवेश समिती अनभिज्ञ असल्याचे दिसते. याबद्दल काही पालकांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. मात्र, त्या तक्रारीवर विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे कळते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "provisional" entry of the eleventh before the process