सायको स्टॅबरचे "स्केच' जारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

नागपूर : सायको स्टॅबरने महिलावंर चाकूने केलेल्या हल्ल्यांमुळे उपराजधानीत एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पूर्वानुभव पाहता या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपीचे "स्केच' जारी केले आहे. या स्केचवरून सायको स्टॅबरचा शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न पोलिस पथके करीत आहेत. शहरात ठिकठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सायको स्टॅबरचा शोध घेण्यात येत आहे.

शुक्रवारी भल्या पहाटे शारदा चौक, जवाहरनगरात घडलेल्या या घटनेने पोलिस दलासह उपराजधानीत खळबळ उडवून दिली. सविता मानेकर (48, रा. इंदिरा गांधी हायस्कूल मागे, जवाहरनगर) आणि मालू राऊत (45, बिडीपेठ, तुकोबाग्राम) अशी जखमी महिलांची नावे आहेत. मानेकर या गृहिणी आहेत, तर राऊत या महापालिकेच्या स्वच्छता कर्मचारी म्हणून कामाला आहेत. सकाळी सहाच्या सुमारास मानेकर या घरासमोरच फिरत होत्या. गेटपासून काही पावलांवरच दुचाकीवरून आलेल्या आरोपीने पाठीवर वार करीत जखमी केले. बाजूच्या गल्लीत राऊत या कामासाठी जात होत्या. मानेकर यांच्यावर वार केल्यानंतर पळून जात असताना सायको स्टॅबरने राऊत यांच्यावरही वार केला. त्यांनीही आरडाओरड केली. परिसरातील नागरिक धावून आले. दोघींनाही नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लहानशा अनुकुचीदार शस्त्राने वार करण्यात आल्याने घाव गंभीर आहेत. नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाल्यानंतर हुडकेश्‍वर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. आज गुन्हे शाखा आणि हुडकेश्‍वर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून स्केचच्या आधारे सायको स्टॅबरचा शोध सुरू केला होता. रात्री उशिरापर्यंत कोणताही सुगावा पोलिसांच्या हाती लागला नव्हता.

Web Title: Psycho stauber's sketch issu