प्रेमी युगलाची गावकऱ्यांनी काढली धिंड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

पवनी तालुक्यातील कोंढा येथे दोन मुलांची आई असलेल्या महिलेचे गावातील विवाहित पुरुषाशी अनैतिक संबंध होते. 38 वर्षीय विवाहित रामकृष्ण कुरंजेकर याचे गावातील दोन मुलांच्या आईशी प्रेमसंबंध होते.

भंडारा : जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील कोंढा येथे अनैतिक संबंध असलेल्या विवाहित प्रेमी युगलांची गावकऱ्यांनी धिंड काढली.

मिळालेल्या माहितीनुसार, पवनी तालुक्यातील कोंढा येथे दोन मुलांची आई असलेल्या महिलेचे गावातील विवाहित पुरुषाशी अनैतिक संबंध होते. 38 वर्षीय विवाहित रामकृष्ण कुरंजेकर याचे गावातील दोन मुलांच्या आईशी प्रेमसंबंध होते.

गावाबाहेर लग्न करून बायकोप्रमाणे नांदायला आणलेल्या दोन मुलांची आई असलेल्या प्रेयसीसोबत विवाहित प्रेमीची हातगाडीवर धिंड काढण्यात आली. यावेळी त्यांचे नातेवाईकही होते. प्रियकर रामकृष्ण याच्या तक्रारीवरुन अड़याल पोलिसांनी 10 गावकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Public disgrace for couples having extra martial affair in Bhandara

टॅग्स