प्राध्यापकाला काळे फासून काढली धिंड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

नागपूर - परीक्षा काळात जप्त करण्यात आलेला मोबाईल आणि प्रवेशपत्र परत देण्यासाठी विद्यार्थिनीस शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या धरमपेठ पॉलिटेक्‍निक कॉलेजच्या प्राध्यापकाच्या तोंडाला काळे फासून शिवसैनिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. एवढेच नव्हे तर त्याची धिंड काढून त्याला अंबाझरी पोलिसांच्या हवाली केले. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. अमित गणवीर असे आरोपी प्राध्यापकाचे नाव आहे. 

पीडित पॉलिटेक्‍निकची विद्यार्थिनी आहे. 13 एप्रिलला ती धरमपेठ पॉलिटेक्‍निक कॉलेजमध्ये परीक्षा देत होती. पेपर लिहिताना तिने कॉपी करीत असल्याच्या संशयावर प्राध्यापक अमित गणवीर याने तिचा पेपर हिसकावला तसेच प्रवेशपत्र आणि मोबाईल जप्त केला होता. मोबाईल परत मागण्यासाठी युवतीने प्राध्यापकाची भेट घेतली असता त्याने तिच्याशी अश्‍लील संवाद साधला. मोबाईल देण्यासाठी शारीरिक सुखाची मागणी केली. युवतीने त्यास नकार दिल्याने मोबाईल देण्यास नकार दिला. आठवडाभरापासून ती युवती त्याला मोबाईल मागत होती. विद्यार्थिनीच्या दुसऱ्या मोबाईलवर प्राध्यापकाने तिला अश्‍लील एसएमएस पाठविणे सुरू केले. याची तक्रार पोलिसात करण्याचा इशारा दिल्यानंतर त्याने घाबरून मोबाईल परत केला. हा सर्व घटनाक्रम युवतीने शिवसेनेचे नेते पंजू तोतवानी यांना सांगितला. त्यानुसार मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पंजू तोतवानी 50 ते 60 कार्यकर्त्यांसोबत कॉलेजमध्ये धडकले. स्टाफ रूममध्ये असलेल्या प्रा. गणवीरला बाहेर काढले आणि जबर मारहाण केली. त्याच्या तोंडाला काळे फासून त्याची धिंड काढली. या प्रकरणी अंबाझरी पोलिस ठाण्यात प्रा. गणवीरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून प्रा. गणवीरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. शिवसैनिकांनी विनापरवानगी कॉलेजमध्ये घुसून मारहाण करणे तसेच धुडगूस घातल्याप्रकरणी तपासाअंती गुन्हा दाखल करण्यात येईल. युवती आणि प्राध्यापकाच्या संभाषणाची ऑडिओ व एसएमएस ताब्यात घेण्यात आले आहेत. 
- अतुल सबनीस, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबाझरी 

Web Title: Public disgrace long black professor