‘इज्जत घरा’त नाही पाणी, वीज!

Ijjat-Ghar
Ijjat-Ghar

गुमगाव - शौचालयाचा उपयोग करून संपूर्ण भारत देशाला निर्मल आणि स्वच्छ करण्यासाठीचा निर्धार प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या जाहिरातीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. शासन ज्या नारीशक्तीकडून करण्याचा असा निर्धार करीत आहे त्याच नारीशक्तीची हिंगणा तालुक्‍यातील गुमगावमध्ये सार्वजनिक शौचालयाच्या दैनावस्थेमुळे कुचंबणा होत आहे. त्यामुळे गावात स्वच्छ भारत अभियान आणि हागणदारीमुक्त गाव योजनेचा बोजवारा उडालेला आहे.

संपूर्ण स्वच्छता कार्यक्रमांतर्गत स्त्रियांसाठी बांधण्यात आलेल्या शौचालयात ना पाणी, ना वीज आणि दरवाजेच नसल्याने शौचालयात जाणे कोणीच पसंत करीत नाही. हे सार्वजनिक शौचालय गावकुसाबाहेर तसेच निर्जनस्थळी बांधले आहेत. यामुळे शौचालयांचा वापर करण्यास महिला टाळाटाळ करताना दिसतात. तिथे असामाजिक तत्त्वांचा दिवसरात्र वावर असतो. सार्वजनिक शौचालयात जाण्यासाठी महिलांना योग्य रस्त्याचा अभाव आहे. झाडाझुडपांतून जाताना जिवावर उदार होऊन मार्ग काढावा लागतो. त्यामुळे तिथे कोणीच जायला तयार नाही. प्रभाग क्रमांक ४ मधील याच शौचालयाची रंगरंगोटी करून स्वच्छतेचा आणि हागणदारीमुक्त गावाचा संदेश देण्यात आला आहे. परंतू गावकुसाबाहेर असलेल्या या शौचालयात सुविधेचा अभाव असल्याने हे कसले ‘इज्जत घर ’असा प्रश्न उपस्थित होतो. ‘ना झाडो के पिछे,ना पेड के नीचे..शौच करना है तो सिर्फ दरवाजे के पिछे’..अशी जर अपेक्षा महिलांकडून आणि नागरिकांकडून करायची असेल तर गावामध्ये सार्वजनिक शौचालय बांधतांना योग्य जागा, मुबलक पाणी आणि विजेची व्यवस्था या सर्वांचा विचार करावा लागेल. तरच सगळीकडे ‘दरवाजा बंद, तो बिमारी बंद’चे चित्र बघावयास मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com