लाकडाउनमध्ये नागरिकांनी सायन्सकोर मैदानावर कसा तयार केला "ड्रायव्हिंग ट्रॅक'

अमरावती : मैदानावर कार चालविण्याचे प्रशिक्षण घेताना नागरिक.
अमरावती : मैदानावर कार चालविण्याचे प्रशिक्षण घेताना नागरिक.

अमरावती : विविध शहरात अशी काही मैदाने असतात जिथे कार्यक्रम होतात, खेळाडूंचा सराव चालतो. त्यासोबतच दुचाकी व चारचाकी शिकणाऱ्यांची आवडीची जागा असते. त्यापैकी एक म्हणजे अमरावतीचे प्रसिद्ध सायन्सकोर मैदान. ऐतिहासिक सभा, सामाजिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या सायन्सकोर विद्यालयाच्या मैदानाला सद्य:स्थितीत ड्रायव्हिंग ट्रॅकचे स्वरूप आले आहे. जिल्हा परिषदेच्या संबंधित यंत्रणेलाही त्याचे काही देणेघेणे दिसत नाही.


या मैदानाचा वापर खेळण्यासाठी कमी आणि वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी जास्त केल्या जात असल्याचे दिसून येते. शहरात एकमेव फुटबॉलचे मैदान म्हणूनही या मैदानाची ओळख आहे. तेथे दुचाकी शिकविण्यासाठी अनेक लहान मुलामुलींना पालक दररोज घेऊन येतात. याव्यतिरिक्त फुटबॉल खेळण्याच्या ठिकाणापासून पंधरा ते वीस मीटरवर बरेच मोठे व्यक्ती आपल्या आप्तस्वकियांना, मित्र-मैत्रिणींना कार चालविणे शिकवितात. सद्य:स्थितीत पाच दिवसांचा आठवडा आणि त्यातही लॉकडाउन काळात शिल्लक असलेला अधिक वेळ अशा पद्धतीने मैदानाची विल्हेवाट लावण्यासाठी खर्ची घातल्या जात आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खेळाडूंच्या सरावासाठी शहरातील जिल्हा स्टेडिअम वगळता नामांकित क्रीडा संस्थांची रिकामी असलेली मैदानेही उपलब्ध करून दिलेली नाहीत. परंतु एकमेव सायन्सकोरच्या मैदानाचा वाट्टेल तसा वापर केल्या जात आहे. कारण मनमानी वापर करणाऱ्यांना टोकणारेच कुणी नाहीत. संचारबंदी काळात तर सकाळ, दुपार व सायंकाळीसुद्धा कार आणि दुचाकी चालविण्याचे प्रशिक्षण येथे दिल्या जाते. शाळा प्रशासन किंवा पोलिस यंत्रणा यापैकी कुणीच सायन्सकोर मैदानावर वाहन चालविण्याचे अवैध प्रशिक्षण देणाऱ्यांना संचारबंदीतही टोकताना दिसत नाहीत. लॉकडाउनपूर्वी येथे अवैध झोपड्या, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची पार्किंग दिसत होते.

ट्रॅकसारखे चित्र
मैदानाच्या ज्या भागात कार चालविण्याचे शिक्षण दिल्या जाते, त्या भागात धावण्यासाठी जसा ट्रॅक असतो तसे गोलाकार चित्र निर्माण झाल्याचे दिसून येते. याव्यतिरिक्त मैदानाचे नुकसान होते ते वेगळेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com