डॉ. जया द्वादशीवार यांच्या नावे ट्रस्ट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

चंद्रपूर, : प्रसिद्ध लेखिका व प्राध्यापक डॉ. जया द्वादशीवार यांच्या कमला दास या मल्याळी कवयित्रीवरील इंग्रजी प्रबंधाचे प्रकाशन आज (ता. 23) शहरातील एनडी हॉटेल येथे करण्यात आले. डॉ. द्वादशीवार यांचे निधन दोन वर्षांपूर्वी झाले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ निकटवर्तीयांकडून त्यांच्या प्रबंधाचे प्रकाशन करण्यात आले.

चंद्रपूर, : प्रसिद्ध लेखिका व प्राध्यापक डॉ. जया द्वादशीवार यांच्या कमला दास या मल्याळी कवयित्रीवरील इंग्रजी प्रबंधाचे प्रकाशन आज (ता. 23) शहरातील एनडी हॉटेल येथे करण्यात आले. डॉ. द्वादशीवार यांचे निधन दोन वर्षांपूर्वी झाले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ निकटवर्तीयांकडून त्यांच्या प्रबंधाचे प्रकाशन करण्यात आले.
या वेळी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, डॉ. देशपांडे, सत्कारमूर्ती शंकरराव पापळकर, सत्कारमूर्ती मोहम्मद जिलानी उपस्थित होते. याप्रसंगी मोहम्मद जिलानी यांना सपत्नीक एक लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना आपण खूप भावनिक झालो. याप्रसंगी त्यांची प्रकर्षाने आठवण येते, असे जिलानी म्हणाले. त्यांच्या नावे डॉ. जया द्वादशीवार पब्लिक स्कूल मूल येथे कशा पद्धतीने सुरू झाले, हे सांगितले. त्यांच्या नावाने लवकरच ट्रस्ट स्थापन करणार असल्याचे जिलानी यांनी सांगितले. या वेळी शंकरबाबा पापळकर यांचाही एक लाख रुपये देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी पापळकर यांनी भावना व्यक्त केल्या. पुरस्कार नको, आम्हाला मतिमंद मुलांसाठी कायदा हवा आहे, असे पापळकर म्हणाले.
या वेळी पापळकर यांच्या मुलांसाठी काही भेटवस्तूसुद्धा देण्यात आल्या. सेवेचे फळ मला मिळाले आहे. आयुष्यभर सेवा करीत राहणार, असे ते म्हणाले. पापळकर यांच्या मानसपुत्राने या वेळी "अशी पाखरे येती' हे गीत सादर केले. या वेळी डॉ. देशपांडे यांनी आजारपणात डॉ. जया द्वादशीवार यांनी कशा पद्धतीने लढा दिला, हे सांगितले. डॉ. तात्या लहाने यांनी डॉ. जयाताई यांनी मुलाप्रमाणे प्रेम केले. मला डॉक्‍टर करण्याचे काम द्वादशीवार यांनी केले. आनंदवनमुळे आम्ही जुळलो. आज त्यांच्या कार्यक्रमात समाजसेवक व शिक्षकाचा सत्कार होत आहे याचा विशेष आनंद आहे, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक देवेंद्र गावंडे यांनी केले. संचालन डॉ. पद्मरेखा धनकर यांनी केले. पुस्तक परिचय पराग धनकर यांनी करून दिला.
कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे, आमदार विजय वडेट्टीवार, नंदू नगरकर, प्रकाश देवतळे, अतुल लोंढे, सुनीता लोढिया, विनोद दत्तात्रेय, अजय स्वामी, डॉ. मडावी, डॉ. शरद सालफळे, श्रीपाद जोशी यांच्यासह बहुसंख्य नागरिक व द्वादशीवार कुटुंबाचे स्नेही उपस्थित होते.

Web Title: publication event