पुणे, अमृतसरसाठी अतिरिक्त वातानुकूलित फेऱ्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

सुपरफास्ट गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा

नागपूर - उन्हाळी सुट्या आणि लग्नसराईमुळे रेल्वेगाड्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन अजनी-पुणे आणि नागपूर-अमृतसर वातानुकूलित सुपरफास्ट विशेष ट्रेनच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. भरउन्हाळ्यात वातानुकूलित रेल्वेची सुविधा उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या दोन्ही साप्ताहिक विशेष ट्रेन विशेष शुल्क तत्त्वावर चालविण्यात येणार असून बुधवार (८ मार्च) पासून बुकिंग सुरू होणार आहेत. गाडी क्रमांक ०२१२४ अजनी-पुणे सुपरफास्ट वातानुकूलित विशेष ट्रेन १४ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान ४ फेऱ्या करणार आहे. ही गाडी प्रत्येक मंगळवारी सायंकाळी ७.५० वाजता अजनी स्थानकावरून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता पुणे स्थानक गाठेल. ०२१२३ पुणे-अजनी सुपरफास्ट वातानुकूलित विशेष ट्रेन १७ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान दर आठवड्याला धावेल. प्रत्येक शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजता पुणे स्थानकावरून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी पहाटे ५.१५ वाजता नागपूर स्थानक गाठेल.

या गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगाव आणि दौंड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. याचप्रमाणे ११ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान नागपूर-अमृतसर साप्ताहिक विशेष ट्रेन चार फेऱ्या करणार आहे. गाडी क्रमांक ०२१२५ नागपूर-अमृतसर ट्रेन ११ मार्च ते १ एप्रिलदरम्यान प्रत्येक शनिवारी सायंकाळी ५.५० वाजता नागपूर स्थानकावरून रवाना होईल. दुसऱ्या दिवशी रात्री  ९.०५ वाजता अमृतसरला पोहचेल. 

०२१२६ अमृतसर-नागपूर वातानुकूलित विशेष गाडी १३ मार्च ते ३ एप्रिलदरम्यान प्रत्येक सोमवारी अमृतसरहून पहाटे ४.२० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२५ वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल. या गाडीला भोपाल, झाशी, ग्वालियर, आग्रा कॅन्ट, नवी दिल्ली, अंबाला, लुधियाना आणि जालंधर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

Web Title: pune, amrutsar ac railway