पुणे-कामाख्या विशेष रेल्वे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

नागपूर - उन्हाळी सुट्या व लग्नसराईनिमित्त रेल्वेगाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुविधेसाठी नागपूरमार्गे पुणे-कामाख्या दरम्यान विशेष साप्ताहिक रेल्वे चालविण्याचा निर्णय दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने घेतला. ही गाडी एप्रिल ते जून महिन्यात १३ फेऱ्या करेल. 

गाडी क्रमांक ८२५०६ कामाख्या-पुणे साप्ताहिक रेल्वे ३ एप्रिल ते २६ जूनदरम्यान प्रत्येक सोमवारी रात्री ११.०५ वाजता कामाख्या स्थानकावरून रवाना होईल आणि प्रत्येक गुरुवारी रात्री २.४५ वाजता पुणे स्थानक गाठेल. ही गाडी प्रत्येक बुधवारी सकाळी ११.१५ वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल. दहा मिनिटांच्या थांब्यानंतर पुढील प्रवासाला रवाना होईल. तसेच ८२५०५ पुणे-कामाख्या विशेष रेल्वेगाडी ६ एप्रिल ते २९ जूनदरम्यान प्रत्येक गुरुवारी सकाळी १०.३० वाजता पुणे स्थानकावरून रवाना होऊन शनिवारी दुपारी ३.२५ वाजता कामाख्या स्थानक गाठेल. 

ही गाडी शुक्रवारी रात्री १.२० वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल. या गाडीला न्यू जलपाईगुडी, आसनसोल, चक्रधरपूर, राऊरकेला, झारसुगुडा, बिलासपूर, रायपूर, दुर्ग, गोंदिया स्थानकावर थांबा दिला आहे. या गाडीला आठ स्लिपर, दोन तृतीय श्रेणी वातानुकूलित, एक द्वितीय श्रेणी वातानुकूलित व एक जनरल डबा आहे. 

कोहळी फाटक वाहतुकीसाठी बंद
कोहळी ते कळमेश्‍वर रेल्वेमार्गावरील कोहळी रेल्वे फाटक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. लेव्हल क्रॉसिंगच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असल्याने फाटक बंद ठेवले आहे. गुरुवारी (ता.२) सायंकाळी ६ पर्यंत कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. तोवर हा मार्ग बंद राहील. 

Web Title: pune-kamakhya special railway