पुणे पालिकेतील एलईडीची चौकशी करणार - रणजित पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

नागपूर - पुणे महापालिकेत एलईडी दिवे लावण्यात अनियमितता झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे नमूद करीत नागरी विकासमंत्री रणजित पाटील यांनी चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही विधान परिषदेत दिली.

अनिल भोसले यांनी एलईडी लाइट लावण्याचे कंत्राट टाटा कंपनीला दिले असताना देयके मात्र दुसऱ्या एका कंपनीच्या नावे काढण्यात आल्याचे "लक्षवेधी'द्वारे सांगितले. टाटा कंपनीकडून अनामत म्हणून घेण्यात आलेले 25 कोटी रुपये राष्ट्रीयीकृत बॅंकेत न ठेवता खासगी बॅंकेत ठेवण्यात आले. महापालिकेच्या प्रमुख वित्त अधिकारी उल्का कळसकर यांच्या हस्ते सर्व व्यवहार सुरू असून, सर्वसाधारण सभेची मान्यता न घेता कामे करण्यात येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. याशिवाय वेगवेगळ्या अनियमिततेवरही त्यांनी बोट ठेवले. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, चौकशीनंतर अधिकाऱ्यांवर कारवाईदेखील करण्यात येईल, असे पाटील यांनी नमूद केले.

Web Title: pune municipal LED inquiry Ranjit patil