फिरायला जाताय! सावधान, पोलिस करताहेत दंडात्मक कारवाई

Maharashtra-police_
Maharashtra-police_

गोंदिया : अनावश्‍यक घराबाहेर पडणे, फिरायला जाणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणे, दुकाना बाहेर ग्राहकांनी अंतर न ठेवणे यासाठी व्यावसायिकांसह 67 लोकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. यावेळी, 30 हजार 800 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी (ता.28) शहरात ठिकठिकाणी करण्यात आली.
                     उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे हे, कार्यालयीन कर्मचारी, स्ट्रॉकिंग फोर्सच्या कर्मचाऱ्यांसह शहरातील सब्जीमंडी, एपीएमसी मार्केट, गणेशनगर, पिंडकेपार रोड, सेलटैक्‍स कॉलनी, पांडे ले आउट भागात कोरोना संसर्गजन्य रोगाची साथ परिसरात पसरू नये, म्हणून गस्त घालत होते. यावेळी, अनावश्‍यक घराबाहेर पडणारे 24, इविनिंग वॉक 8, शारीरिक अंतर न ठेवणारे व्यावसायिक 11, दुकानाबाहेर ग्राहकांनी शारीरिक अंतर न ठेवणे 1 व सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणारे 34 असे, एकूण 67 लोकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून 30 हजार 800 रूपयाचा दंड वसूल करून शासकीय तिजोरीत जमा केला.                                                                                                ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप कुंदोजवार, सहायक फौजदार रामलाल सार्वे, पोलिस नायक अशोक अंबरवाडे, पोलिस नायक सुधीर भालाधरे, पोलिस नायक खेमराज बोधनकर, पोलिस नायक दुर्गाप्रसाद कनोजे, महिला पोलिस शिपाई ज्योती बांगरे, रूपकला रहिले, पोलिस शिपाई पृथ्वीराज चव्हाण, चालक पोलिस हवालदार जयेंद्र गजभिये, स्ट्रायकिंग फोर्सचे कर्मचारी पोलिस हवालदार हितेश तिडके, मुन्ना चंदेल, चालक पोलिस नायक कुणाल रामटेके, महिला पोलिस शिपाई सपाना कोंटांगले, सुदीपा उराडे यांनी केली.

फिजिकल अंतर ठेवावे                                                             व्यावसायिकांनी फिजिकल अंतर ठेवावे व ग्राहकांनी अंतर ठेवूनच सामान खरेदी करावे. जनतेने अनावश्‍यक घराबाहेर पडू नये, सकाळी व संध्याकाळी  घराबाहेर निघू नये.
पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com