मेड इन इंडियाकार पुरुषोत्तम बोरकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

वऱ्हाडी भाषा समद्ध करणारे, मेड इन इंडियाकार पुरुषोत्तम बोरकर यांचे आज (ता.१७) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने सुटाळा बु. खामगाव येथे निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्राची हानी झाली आहे.

अकोला - वऱ्हाडी भाषा समद्ध करणारे, मेड इन इंडियाकार पुरुषोत्तम बोरकर यांचे आज (ता.१७) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने सुटाळा बु. खामगाव येथे निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्राची हानी झाली आहे.

उद्या (ता. १८ जुलै) सकाळी १० वाजता सुटाळा, खामगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे मराठी साहित्य क्षेत्रात फार मोठे याेगदान असून त्यांची ४५ पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. मूळचे अकोला जिल्ह्यातील बोराळा येथील रहिवासी असलेले बोरकर यांनी सुरुवातीच्या काळात वर्तमानपत्रात उपसंपादक म्हणून काम केलेले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Purushottam Borkar Passed Away