पुसद-माहुर-महागाव मार्गावरील पुलावर पाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

यवतमाळ : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. महागाव तालुक्‍यात झालेल्या दमदार पावसाने गुंज परिसरातील ओढे-नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच पावसामुळे गुंज येथील आठवडी बाजार देखील ठप्प झाला. शनिवारी गुंज बसस्थानकावरील पुलावरून पाणी जात आसल्याने पुसद-माहुर-महागाव रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या तर पैनगंगेला पूर आल्याने नदीकाठच्या शेतात पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pusad-mahur-mahagaon road block