अरे वाह! बाप्पाच्या विसर्जनासाठी कोरोना योद्धयांनी घेतला पुढाकार; चार विसर्जन रथ तयार  

Pusad Police Made Visarjan Rath for Ganesh Visarjan
Pusad Police Made Visarjan Rath for Ganesh Visarjan

पुसद (जि. यवतमाळ) :  कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी वाढू नये, म्हणून नगरपालिका व पुसद पोलिसांनी श्रीगणेशाच्या मूर्ती विसर्जनासाठी खास चार विसर्जन रथ तयार केलेले आहेत. येत्या एक सप्टेंबरला सार्वजनिक विसर्जन मिरवणूक प्रशासनाने रद्द केली असली तरी हे विसर्जन रथ दर दोन तासाला विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर तैनात राहणार आहेत.

या विसर्जन रथातून सार्वजनिक व घरगुती गणपतींचे एकत्रित विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे मंडळ व गणेश भक्तांनी आपल्या गणपतीच्या मूर्ती या विसर्जन रथात आणून द्याव्यात. यंदा गणेश विसर्जनाची मिरवणूक निघणार नाही. शिवाय आतषबाजी, डीजे, ढोलताशे, नाचगाणे या प्रकारालादेखील बंदी घालण्यात आलेली आहे. साधेपणाने सार्वजनिक विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी व गणेशभक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुसदचे पोलिस उपअधीक्षक अनुराग जैन यांनी केले आहे.

गणेशभक्तांनी घरी पूजा-अर्चा व आरती केल्यानंतर स्वतंत्रपणे गणपतीची मूर्ती विसर्जनासाठी नेण्याऐवजी विसर्जन रथात द्यावी. शिवाय निर्माल्यासाठी नगरपालिकेने स्वतंत्र गाड्यांची व्यवस्था केलेली आहे. नागरिकांनी व गणेशभक्तांनी विसर्जनाच्या ठिकाणी अजिबात गर्दी करू नये. पोलिस स्वतः मंडळाकडे जाऊन गणेश मूर्ती विसर्जित करण्याची जबाबदारी घेणार आहेत. तोंडाला मास्क बांधावा व कोरोना संसर्ग टाळण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपामुळे भक्तांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. श्री गणरायाची मूर्ती विसर्जनासाठी खास तयार करण्यात आलेल्या विसर्जन रथाचा उपयोग करावा. मिरवणूक रद्द केली असल्याने गर्दी करू नये. पोलिस प्रशासनाला शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे.
- अनुराग जैन, 
पोलिस उपअधीक्षक, पुसद (जि. यवतमाळ) 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com