महापालिका अभियंत्यास धक्काबुक्की

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

अमरावती : शंकरनगर कॅन्सर हॉस्पिटलजवळ रस्ता बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अभियंत्यासोबत धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे वातावरण तापले होते. बुधवारी (ता. 18) दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

अमरावती : शंकरनगर कॅन्सर हॉस्पिटलजवळ रस्ता बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अभियंत्यासोबत धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे वातावरण तापले होते. बुधवारी (ता. 18) दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
राजापेठ पोलिसांनी याप्रकरणी योगेंद्र दातेराव व वीरेंद्र दातेराव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली, असे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांनी सांगितले. अभियंता सुहास चव्हाण यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. परिसरात महापालिकेने रस्त्याच्या बांधकामाची तयारी सुरू केली, तर दुसऱ्या बाजूने ज्या जागेवर रस्ता बांधकाम केल्या जाणार आहे. ती जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा दातेराव यांनी केला. शिवाय ले-आउट मंजूर असल्याचे दातेराव यांनी काही दस्तऐवज पोलिसांसमोर सादर केले. त्यावरून अनेक दिवसांपासून हा वाद सुरू आहे, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी महापालिकेजवळ त्या जागेबाबत प्रशासनाने काही निर्णय घेतला आहे काय? याबाबत विचारले असता, गुन्हा दाखल होईपर्यंत महापालिकेने जागेबाबत काही ठोस निर्णय झाल्याचे दस्तऐवज पोलिसांकडे सादर केले नाही, असे पोलिस निरीक्षक श्री. लांडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A push to the municipal engineer