कंट्रोल युनिटला "पिंक' सील लावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

नागपूर : निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेवारांसमोर कंट्रोल युनिट सील केले नसल्याने त्यावर दक्षिण नागपूरचे अपक्ष उमेदवार तसेच माजी उपमहापौर सतीश होले यांनी आक्षेप घेतला. कंट्रोल युनिटला गुलाबी रंगाचे सील लावावे, अशी मागणी करून त्यांनी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आक्षेपाचे पत्र दिले आहे.लोकसभेच्या वेळी कंट्रोल युनिट तसेच येथील सीसीटीव्ही बंद असल्याने कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी आक्षेप घेतला होता. याची दखलही निवडणूक आयोगाने घेतली होती. एवढेच नव्हे तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवर संशयसुद्धा व्यक्त केला होता.

नागपूर : निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेवारांसमोर कंट्रोल युनिट सील केले नसल्याने त्यावर दक्षिण नागपूरचे अपक्ष उमेदवार तसेच माजी उपमहापौर सतीश होले यांनी आक्षेप घेतला. कंट्रोल युनिटला गुलाबी रंगाचे सील लावावे, अशी मागणी करून त्यांनी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आक्षेपाचे पत्र दिले आहे.लोकसभेच्या वेळी कंट्रोल युनिट तसेच येथील सीसीटीव्ही बंद असल्याने कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी आक्षेप घेतला होता. याची दखलही निवडणूक आयोगाने घेतली होती. एवढेच नव्हे तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवर संशयसुद्धा व्यक्त केला होता. पुन्हा असा प्रकार घडू नये याकरिता होले यांनी आधीच आपला आक्षेप नोंदवला. निवडणूक आयोगातर्फे कंट्रोल युनिट पुरविण्यात आले आहेत. त्यास सील करण्याच्या साहित्याचाही पुरवठा करण्यात आला. मात्र, त्याचा वापर न करता भेल कंपनीचे सील लावण्यात आले असल्याचा आरोपही होले यांनी तक्रारीतून केला. या सीलवर शंका घेऊन त्यांनी सर्व कंट्रोल युनिट तपासण्यात यावे, त्यावर आयोगाने पुरवलेले गुलाबी रंगाच्या पेपरने सील करावे आणि निवडणूक आयोगाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे अशी मागणी होले यांनी केली आहे.
ईव्हीएमवर देशभरातून शंका घेतली जात आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष झालेल्या मतदानापेक्षा काही ईव्हीएममध्ये जादा आढळली होती. आकडेवारीसुद्धा जुळत नव्हती. काही मतदारसंघात धक्कादायक निकाल लागले आहेत. त्यामुळे ईव्हीएममध्ये मानवी हस्तक्षेप होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. याकरिता आपण आक्षेप घेतला आहे.
-सतीश होले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Put a "Pink" seal on the control unit