प्रा. साईबाबांची कारागृहात रवानगी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

नागपूर : नक्षलवाद्यांना मदत केल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेले प्रा. साईबाबा यांना चार दिवसांआधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. सोमवारी पोलिसांच्या कडक पहाऱ्यात त्यांना सेंट्रल जेलमधून दवाखान्यात आणत तपासण्या करण्यात आल्या. यानंतर जवळपास 20 पोलिसांच्या पहाऱ्यामध्ये परत कारागृहामध्ये पाठविण्यात आले.

दिल्ली विश्‍वविद्यालयाचे प्रा. जी. एन. साईबाबा हे नक्षलवाद्यांना मदत केल्याप्रकरणी नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. प्रा. साईबाबा यांना अनेक आजारांनी ग्रासले आहेत. काही दिवसांआधी त्यांना तब्येतीच्या कारणावरून कारागृहाच्या दवाखान्यातून सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये हलविले होते. येथील डॉ. रामटेके यांनी त्यांच्या काही तपासण्या करण्याचा सल्ला दिला होता. सोमवारी त्यांना कारागृहातून दवाखान्यात आणत लिव्हर, न्यूरोलॉजी व कार्डियोलॉजी विभागात तपासणी करण्यात आली. यानंतर परत कारागृहामध्ये पाठविण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pvt. Sai Baba departs in jail