esakal | परप्रांतातील नागरिकांच्या हातावर मारणार शिक्के

बोलून बातमी शोधा

Quarantine home to 14,000 citizens in Akola district!

जिल्ह्यात सुमारे १५ हजारावर नागरिक मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या जिल्ह्यातून व परप्रांतातून आले आहेत. या सर्व लोकांच्या हातावर गृह विलगीकरणाचे (होम क्वारंटाईन) शिक्के मारण्यात येणार आहेत. यासंबंधिचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

परप्रांतातील नागरिकांच्या हातावर मारणार शिक्के
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात सुमारे १५ हजारावर नागरिक मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या जिल्ह्यातून व परप्रांतातून आले आहेत. या सर्व लोकांच्या हातावर गृह विलगीकरणाचे (होम क्वारंटाईन) शिक्के मारण्यात येणार आहेत. यासंबंधिचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीमुळे मुंबई, पुणे, नागपूर यासह इतर जिल्ह्यातून व परप्रांतातून १५ हजारावर नागरिक जिल्ह्यात परतले आहेत. संबंधित नागरिक शिक्षणासह उदरनिर्वाह किंवा नोकरीसाठी इतर ठिकाणी गेले होते. परंतु संबंधित नागरिक ज्या गावातून जिल्ह्यात दाखल झाले, त्या ठिकाणी कोरोना विषाणूचे अनेक रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे अशा नागरिकांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच इतर नागरिकांना सुद्धा त्यांच्यापासून संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांच्या हातावर गृह विलगीकरणाचे शिक्के मारण्यात येणार आहेत.

यासंबंधिचे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. संबंधित नागरिकांच्या हातावर शिक्का मारून त्यांना घरातच अलगीकरण करून ठेवा, यासाठी सर्वतोपरी खबरदारी घ्या, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. याचा भंग करणाऱ्यांसाठी तालुकास्तरावर स्वतंत्र अलगीकरणाची व्यवस्था निर्माण करून त्यांना तेथे ठेवा, असे आदेश सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बाहेरगावावरून परत येवून १४ दिवस झालेल्या नागरिकांच्या हातावर शिक्के मारण्यात येणार नाहीत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

फिरणाऱ्यांवर फौजदारी
बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना फिरण्यापासून अटकाव घालण्यासह कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी प्रत्येक गावात ग्राम स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीतील सदस्यांनी अशा नागरिकांच्या घरी जाऊन ते घरातच असल्याची खातरजमा करावी. असे व्यक्ती बाहेर फिरत असल्याचे दिसून आल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

अशी आहे जिल्ह्याची स्थिती
बाहेरील जिल्ह्यातून आलेले प्रवाशी - १५ हजार १८२
तपासणी केलेले प्रवाशी - १४ हजार ८५३
१४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले - ४४६
१४ दिवसांचा कालावधी शिल्लक असलेले - १४ हजार ७३६