मनपाच्या विषय समित्यांचा कोरम पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

नागपूर ः कॉंग्रेस आणि बसपने महापालिकेच्या विविध विषय समित्यांवर आपल्या पक्षाच्या नगरसेवकांची नावे महापालिकेच्या सभेत महापौर यांच्याकडे सादर केली. महापौरांनी संबंधित नावांची घोषणा केल्यानंतर समितीची कार्यकारिणी पूर्ण झाली.

नागपूर ः कॉंग्रेस आणि बसपने महापालिकेच्या विविध विषय समित्यांवर आपल्या पक्षाच्या नगरसेवकांची नावे महापालिकेच्या सभेत महापौर यांच्याकडे सादर केली. महापौरांनी संबंधित नावांची घोषणा केल्यानंतर समितीची कार्यकारिणी पूर्ण झाली.
स्थापत्य विद्युत व प्रकल्प समितीवर अन्सारी सय्यदा बेगम, उज्ज्वला बनकर (कॉंग्रेस), जितेंद्र घोडेस्वार (ब.स.प.), वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीवर कमलेश चौधरी, आशा उईके (कॉंग्रेस) आणि संजय बुर्रेवार (ब.स.प.), विधी व सामान्य प्रशासन विशेष समितीवर संदीप सहारे, दर्शनी धवड (कॉंग्रेस) आणि मंगला लांजेवार (ब.स.प.) यांची नियुक्ती करण्यात आली. शिक्षण विशेष समिती : प्रणीता शहाणे, हर्षदा साबळे (कॉंग्रेस), इब्राहीम तोफीक अहमद (ब.स.प.), गलिच्छवस्ती निर्मूलन व घर बांधणी समिती : परशराम मानवटकर व भावना लोणारे (कॉंग्रेस) आणि नरेंद्र वालदे (ब.स.प.), क्रीडा विशेष समिती : रमेश पुणेकर व मनोज सांगोळे (कॉंग्रेस) आणी वंदना चांदेकर (ब.स.प.), महिला व बालकल्याण विशेष समिती : स्नेहा निकोसे व साक्षी राऊत (कॉंग्रेस) आणि विरंका भिवगडे (ब.स.प.), जलप्रदाय विशेष समिती : जुल्फीकार भुट्टो, बंटी शेळके (कॉंग्रेस), वैशाली नारनवरे (ब.स.प.), कर व कर आकारणी विशेष समिती : स्नेहा निकोसे व नितीश ग्वालबंशी (कॉंग्रेस), इब्राहीम तौफीक अहमद (ब.स.पा.), अग्निशमन विशेष समिती : पुरुषोत्तम हजारे व मनोज गावंडे (कॉंग्रेस), ममता सहारे (ब.स.पा.) तसेच परिवहन समिती ः नरेंद्र वालदे यांची नियुक्ती करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quorum of Municipal Affairs Committees completed