रब्बीतील पिकांना विम्याचे कवच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

नागपूर - अवकाळी पाऊस, गारपीट व नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी रब्बीतील पिकांना पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत विमा लागू करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना 31 डिसेबरपर्यंत पीकविमा काढता येणार आहे.

सध्या रब्बीचा हंगाम सुरू असून, पिकांचा विमा उतरविण्यासाठी कृषी विभाग व जिल्हा प्रशासनातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. तसेच तालुकास्तरावर पीकविमा योजना शिबिर आयोजित केले आहेत. शेतकऱ्यांना शिबिर स्थळीच विमा उतरविण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.

शिबिरात नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी, सहायक उपनिबंधक, सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक, जिल्हा परिषद कृषी व राजस्व विभागाचे क्षेत्रीय अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विमा उतरविताना अर्जासोबत सातबाराचा उतारा, पीक पेऱ्याचे प्रमाणपत्र, ओळखपत्र आदी कागदपत्रे जोडणे आवश्‍यक आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी शिबिरामध्ये याबाबींची पूर्तता करण्यासाठी क्षेत्रीय यंत्रणेच्या प्रतिनिधींकडून सहकार्य करण्यात येणार आहे.

शिबिराचे नियोजन
पिकांचा विमा उतरविण्यासाठी प्रत्येक तालुक्‍यात शिबिर आयोजित केले आहे. मौदा, उमरेड, भिवापूर, कुही तालुक्‍यात 2 डिसेंबर, रामटेक, पारशिवनी, कामठी, सावनेर व हिंगणा तालुक्‍यात 3 डिसेंबर आणि नागपूर, काटोल, नरखेड व कळमेश्‍वर तालुक्‍यातील पंचायत समिती कार्यालयात 5 डिसेंबरला शिबिर घेण्यात येणार आहे.

विम्याचा हप्ता
जिल्ह्यातील राजस्व मंडळातील बिगर कर्जदार शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये प्रतिहेक्‍टर या प्रमाणे गहू बागायत पिकासाठी 217 रुपये, गहू जिरायत पिकासाठी 333 रुपये, हरभरा व ज्वारी जिरायत पिकासाठी 158 रुपयांचा विमा हप्ता बॅंकेत भरता येणार आहे. त्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे संबंधित बॅंकेत खाते असणे आवश्‍यक आहे.

Web Title: Rabi crops insurance