मी काचेच्या घरात नाही तर दगडी वाड्यात राहतो! - विखे पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

नागपूर - मी काचेच्या घरात नव्हे, तर दगडी वाड्यात राहतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माझी काळजी करू नये, या शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या शेरेबाजीला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

नवी मुंबईतील सिडको घोटाळ्यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विखे पाटील यांना उद्देशून ‘जो शिशे के घर में रहते हैं, वो दुसरों पर पत्थर नहीं फेका करते’ असे विधान केले होते. त्या विधानाचा समाचार घेताना विखे पाटील म्हणाले की, सरकारचा पारदर्शक काचेचा कारभार विधिमंडळात फुटताना आपण अनेकदा पाहिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माझी चिंता करण्याऐवजी स्वतःची काळजी घ्यावी, एवढीच माझी सूचना असल्याची उपरोधिक टीका केली.

Web Title: radhakrishna vikhe patil talking politics