मेडिकलच्या त्या तीन प्राध्यपकांना अभय कुणाचे?

शुभम बायस्कार
सोमवार, 16 डिसेंबर 2019

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्रीरोग व प्रसुतीरोगशास्र विभागातील एका मुलीने रॅगींग झाल्याची तक्रार 18 फेब्रुवारी रोजी दिली होती. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी मेडिकल कॉलेजमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ व संचालक वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्यावतीने सोमवारी 14 ऑक्टोंबर रोजी समिती दाखल झाली होती. यामध्ये उच्चपदस्थ सहा अधिकाऱ्यांचा समावेश होता. समितीकडून स्रीरोग व प्रसृतीशास्र विभागातील विभागप्रमुख, प्राध्यपकांसह विद्यार्थ्यांना या प्रकरणासंदर्भात विचारपूस करण्यात आली होती. मात्र, डॉ.एळीकरांच्या समितीने केली होती बदलीची शिफारस केली होती. मात्र, महिना उलटूनही आदेश नसल्याने डीएमइआरच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ओबीजीवाय विभागातील रॅगींग प्रकरण हातळण्यात अपयशी ठरलेल्याचा ठपका ठेवत त्या तीन डॉक्टरांची उचलबांगडी करण्याची शिफारस डॉ.कानन एळीकर यांच्या समितीने डीएमइआरकडे केली होती. शिफारस करून महिन्याभरपेक्षा अधीक कालावधी उलटून सुद्धा यासंदर्भात कुठलेही आदेश मेडिलक कॉलेज प्रशासनाला प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे त्या तीन प्राध्यपकांना अभय कुणाचे? असा सवाल उपस्थित होत आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्रीरोग व प्रसुतीरोगशास्र विभागातील एका मुलीने रॅगींग झाल्याची तक्रार 18 फेब्रुवारी रोजी दिली होती. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी मेडिकल कॉलेजमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ व संचालक वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्यावतीने सोमवारी 14 ऑक्टोंबर रोजी समिती दाखल झाली होती. यामध्ये उच्चपदस्थ सहा अधिकाऱ्यांचा समावेश होता. समितीकडून स्रीरोग व प्रसृतीशास्र विभागातील विभागप्रमुख, प्राध्यपकांसह विद्यार्थ्यांना या प्रकरणासंदर्भात विचारपूस करण्यात आली होती. 

Image may contain: 3 people, close-up

हेही वाचा - विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्याचे संकेत

प्रकरणाची दोन दिवस चौकशी
एमयुएचएस व डीएमइआर कडून आलेल्या या समितीमध्ये औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.कानन एळीकर या प्रमुख होत्या. डॉ.एळीकर यांच्या नेतत्वात या समितीने सदर प्रकरणांची दोन दिवस चौकशी केली होती. त्यानंतर यासंदर्भातील अहवाल संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग मुंबई व आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांना पाठविला होता. या अहवालामध्ये स्रीरोग व प्रसुतीरोगशास्र विभागातील विभागप्रमुख व प्राध्यापक हे प्रकरण हाताळण्यात कमी पडल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे स्री रोग व प्रसुतीरोग शास्र विभागाच्या तत्कालीन विभागप्रमुख डॉ.अपर्णा वाहाने, सहयोगी प्राध्यापक डॉ.धर्मेद्र राऊत, डॉ.श्‍यामकुमार सिरसाम यांच्या बदलीची शिफारसही अहवालात करण्यात आली होती. 

हेही वाचा - कृषी पंढरी गजबजणार 

रॅगींगसारख्या गंभीर प्रकरणावर हालचाल नाही
याप्रकरणाला महिनाभरापेक्षा अधीक कालावधी उलटून सुद्धा मेडिकल कॉलेज प्रशासनाला तिघांच्याही बदलीसंदर्भात आदेश प्राप्त झालेले नाहीत. रॅगींगसारख्या अतिगंभीर, ज्वलंत मुद्यावर न्यायालय, विद्यापीठ अनुदान आयोगाची कठोर कायदे आहेत. गतीने कारवाईचीही तरतूदही आहे. मात्र महिना उलटूनही याप्रकरणी हालचाली नसल्याने त्या प्राध्यपकांना अभय कुणाचे? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा - धर्म-जातीच्या आधारावर फुट पाडण्याचे षडयंत्र

लवकरच निर्णय
बदलीच्या संदर्भात मुख्यमंत्री, मंत्री यांच्याकडून अंतिम निर्णय होतो. मध्यंतरीच्या काळात सरकार स्थापन नव्हते. आता सरकार स्थापन झाले आहे. समितीकडून प्राप्त झालेली बदलीची शिफारस प्रस्तावित आहे. लवकरच यासंदर्भात निर्णय घेतला जाईल.
-डॉ.तात्याराव लाहाणे, संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raging at akola medical collage