राहुल गांधींच्या होर्डिंगला काळे फासले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

अमरावती - राफेलच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून क्‍लीन चिट मिळाल्यावर भाजप कार्यकर्ते उत्साहात दिसत आहेत. भाजयुमोच्या काही कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमरावती येथील होर्डिंगला काळे फासून आंदोलन केले. सर्वोच्च न्यायालयाकडून राफेल मुद्द्यावर सरकारला क्‍लीन चिट देण्यात आल्याने आता शहरात खोट्या आरोपांचे फलक लागता कामा नये, अशी भूमिका घेत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी गर्ल्स हायस्कूल चौकातील राहुल गांधी, तसेच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या होर्डिंगला काळे फासले.
Web Title: Rahul gandhi Hording Black Colour BJP Politics